Share

Rakesh Jhunjhunwala : राकेश झुनझुनवालानंतर त्यांच्या करोडोंच्या संपत्तीचा मालक कोण होणार? समोर आली ‘ही’ नावे

Rakesh Jhunjhunwala: इंडियाचे वॉरन बफे म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचा १४ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. राकेश झुनझुनवाला गेल्यावर त्यांच्या करोडोंच्या संपत्तीची मालकी आता कोणाकडे येणार? या गोष्टीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून होते. त्यातच आता त्यांच्या मृत्युपत्राबाबत माहिती समोर येत आहे.

राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती ५.८ अब्ज डॉलर म्हणजेच ४६ हजार कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे. ती सर्व संपत्ती राकेश झुनझुनवाला यांनी कोणाला मिळणार, याबाबत आपल्या मृत्युपत्रात लिहिले आहे. झुनझुनवाला यांच्या मृत्युपत्रात त्यांची पत्नी रेखा, भाऊ, पुतण्या, त्यांचा जवळचा मित्र व वकील देसाई यांची नावे असल्याची माहिती समोर येते.

झुनझुनवाला यांच्या गुंतवणुकीच्या निर्णयावर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीमध्ये राकेश झुनझुनवाला यांचे जवळचे मित्र डी मार्टचे मालक राधाकिशन दमानी, कल्पराज धरामशी, अमल पारीख हे सर्व सदस्य असणार आहेत.

राकेश झुनझुनवाला यांच्या संपत्तीबाबतच्या समितीचे राधाकिसन दमानी हे विश्वस्त म्हणून काम पाहणार आहेत. राकेश झुनझुनवाला यांची ४६ हजार कोटींची संपत्ती तसेच त्यांची हवाई वाहतूक क्षेत्रातील अकासा एअरलाइन्स ही कंपनी सांभाळण्याची जबाबदारी आता त्यांची पत्नी व मुलावर येऊन पडली आहे.

राकेश झुनझुनवाला यांना एक मुलगी, दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. पुढील काळात प्रामुख्याने राकेश झुनझुनवाला यांची अब्जावधी संपत्ती सांभाळण्याचे काम राकेश झुनझुनवालांची पत्नी रेखा व मुलगा करणार आहेत. अकासा एअरलाइन्स ही कंपनी त्यांची पत्नी रेखा व राकेश झुनझुनवाला यांनीच सुरू केली आहे.

राकेश झुनझुनवाला यांनी १९८५ ला अवघ्या ५ हजाराची गुंतवणूक करून त्याचे ४६ हजार कोटी रुपयांत रूपांतर केले. हे केवळ बुद्धिमत्ता, चातुर्य आणि मेहनतीच्या जोरावर साध्य झाले. आज जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या फॉब्जच्या यादीत ४४० क्रमांकावर राकेश झुनझुनवाला आहेत.

महत्वाच्या बातम्या-
ED : निर्दोष पदाधिकाऱ्यांना विनाकारण अटकेत ठेवणाऱ्या ईडीला हायकोर्टाचा जोरदार दणका; दिले ‘हे’ आदेश
गणेशभक्तांना राज्य सरकारने दिले स्पेशल गिफ्ट; वाचून खुश व्हाल
‘माझी संपत्ती मी कष्टाने कमावलीय; कोट्यावधींचे गिफ्ट घेणाऱ्या जॅकलीन फर्नांडिसचा ईडीसमोर दावा

ताज्या बातम्या आर्थिक इतर

Join WhatsApp

Join Now