Share

पुष्पा पाठोपाठ अल्लू अर्जुनचे हिंदीतील आणखी ६ चित्रपट बाॅलीवूडमध्ये धुमाकूळ घालणार, पहा यादी..

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा नुकताच रिलीज झालेला ‘पुष्पा’ हा चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. यानंतर चाहत्यांच्या नजरा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या आगामी चित्रपटांकडे लागल्या आहेत. पुष्पा नंतरही अल्लू अर्जुन अनेक मनोरंजक चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. या सिनेस्टारचे हे आगामी चित्रपट दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील बड्या दिग्दर्शकांसोबत येणार आहेत. अल्लू अर्जुन आगामी चित्रपटाची उत्सुकता आता सर्वाना लागून आहे.

‘पुष्पा- द राईज’ या चित्रपटानं रीलिज झाल्यापासून अनेक विक्रम मोडले आहेत. कोणतंही प्रमोशन न करता या चित्रपटाने इतकी मोठी उंची गाठली आहे. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या चित्रपटातील गाण्यांपासून ते डायलॉग्सची भुरळ पडली आहे. असे असताना आता अल्लू अर्जुनाच्या आगामी चित्रपटाची यादी समोर आली आहे.

पुष्पाच्या बंपर यशानंतर साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन त्याच्या चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये व्यस्त आहे. सुपरस्टार अल्लू अर्जुन मार्चपासून पुष्पाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग सुरू करणार आहे. चित्रपट स्टार अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट पुष्पा 2 या वर्षाच्या अखेरीस चित्रपटगृहात पोहोचण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचीही चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.

पुष्पा-द रुलनंतर चित्रपट स्टार अल्लू अर्जुन त्याचा पुढील चित्रपट ‘आयकॉन’ सुरू करणार आहे. सूत्रांच्या मते, अल्लू अर्जुनसोबत या चित्रपटात पूजा हेगडे आणि क्रिती शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक वेणू श्रीराम आहेत. अल्लू अर्जुन पहिल्यांदाच अभिनेता वेणू श्रीरामसोबत काम करत आहे.

तसेच, चित्रपट स्टार अल्लू अर्जुन अभिनेता बोयापती श्रीनूसोबत पुढील चित्रपटासाठी चर्चेत आहे. सरनायडूसारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन ही अभिनेता-दिग्दर्शक जोडी पुन्हा एकत्र येत आहे. आयकॉननंतर हा चित्रपट फ्लोरवर जाणार असल्याचे वृत्त आहे.

KGF चित्रपट दिग्दर्शक प्रशांत नीलने त्याच्या पुढील चित्रपटासाठी अल्लू अर्जुनसोबत हातमिळवणी केल्याची चर्चा चित्रपट वर्तुळात आहे. KGF 2 आणि सालार नंतर हा चित्रपट सुरू होईल. सध्या दिग्दर्शक प्रशांत नील प्रभास स्टारर ‘सलार’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.

म्हंटले जात आहे की, मिर्ची, श्रीमानंथुडू, भारत आईने नेनू आणि जनता गॅरेज सारखे ब्लॉकबस्टर दिल्यानंतर कोराटला शिवा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनसोबत हातमिळवणी करणार आहे. या चित्रपटाबाबत अभिनेते-दिग्दर्शक दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. तसेच चित्रपट स्टार अल्लू अर्जुन देखील दिग्दर्शक मुरुगादाससोबत हातमिळवणी करणार आहे. दोन्ही अभिनेते-दिग्दर्शकांमध्ये पुढील चित्रपटाची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे आता चाहते देखील अल्लू अर्जुन चा आगामी चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

इतर

Join WhatsApp

Join Now