करोना विषाणूमुळे गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक सोहळ्याला बंदी घालण्यात आली होती. मात्र आता करोना विषाणूचा प्रसार कमी झाल्यामुळे लग्न सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. आता लग्नसराईचा कालावधी सुरू आहे. अलीकडे लग्नाआधी प्री वेडिंग फोटोशूट करण्याची नवीन प्रथा सध्या सुरू झाली आहे.
लग्नाच्या आधीच हे फोटो व्हायरल केले जातात. मात्र ही बातमी थोडी वेगळी आहे. लग्नाच्या आधी होणाऱ्या फोटोशूटने नवरी चांगलीच अडचणीत सापडली आहे. वराने चक्क लग्नास नकार दिला आहे. जाणून घेऊया नेमकं घडलं काय? वराने का दिला लग्नास नकार? काय आहे कारण?
हे प्रकरण बुलढाण्यातील असल्याची माहिती मिळत आहे. चिखली तालुक्यातील एक गावातल्या २० वर्षीय तरुणीचे तालुक्यातीलच २५ वर्षीय अभियंता तरुणाशी लग्न ठरले होते. त्यांचा मोठा आनंदात साखरपुडा देखील करण्यात आला होता. तर आता लग्नाची तारीख देखील जवळ आली होती.
मात्र त्या आधीच वराने लग्नास नकार दिला. धक्कादायक बाब म्हणजे, अलिकडेच लग्न ठरलेल्या या युवक व युवतीने गोव्याला जाऊन ‘प्री वेडिंग’ फोटोशूट केलं होतं. फोटोशूट झाल्यानंतर ते दोघेही गोव्यातील एका हॉटेलमध्ये रात्रभर सोबत राहिले. अन् दुसऱ्याच दिवशी वराने लग्नास नकार दिला.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी उठल्यावर तरुणाने (वराने) गोंधळ घातला. ‘मला जशी मुलगी हवी होती, तशी तू नाही’ असं वराने तरुणीला स्पष्टपणे सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी तरुणाने तरुणीचे सर्व कपडे फाडून मोबाईल फोडला. या सर्व विचित्र प्रकारामुळे तरुणी प्रचंड घाबरली.
त्यानंतर घरी आल्यावर तरुणीने कुटुंबीयांना याचबरोबर आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकुण आई – वडिलांच्या पाया खालची जमीन सरकली. आता दोन्हीही बाजूंनी सामाजिक स्तरावर या प्रकरणावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाने नातेवाईकांना देखील जबर धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मानलं बुवा! अनाथ आश्रमातल्या शितलने शेतकरी मुलाशी बांधली लग्नगाठ; केली होती ‘ही’ प्रतिज्ञा
यासिन मलिकच्या शिक्षेनंतर आफ्रिदीने गरळ ओकली, अमित मिश्राने आफ्रिदीची लबाडीच समोर आणली
मनसे आमदाराचा राज्यसभेसाठी संभाजीराजेंना पाठींबा, म्हणाला, पुण्य पदरात पाडून..
आमची बौद्ध विहारं पाडून मंदीरे, मशिदी बनवल्या, आमची विहारं परत द्या; आगलावेंची मागणी






