लता मंगेशकर यांचे पार्थिव अंतिम संस्कारापूर्वी दक्षिण मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. येथे देशभरातील नामवंत व्यक्तींनी लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पुष्प अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी यांनीही त्याला श्रद्धांजली वाहिली, मात्र काही लोक शाहरुखच्या श्रद्धांजलीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
अंत्यदर्शनासाठी स्टेजवर गेले असता शाहरुखने दोन्ही हात फैलावून आधी लता मंगेशकर यांच्यासाठी दुवा मागितली. यानंतर मास्क खाली करुन तो काहीतरी करताना दिसला. मग दोन्ही हात जोडून शाहरुख खाननं लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला प्रदक्षिणा घातली. या संपूर्ण प्रकारावरुन सोशल मीडियात एका नवा वाद चर्चिला जातो आहे.
वास्तविक, शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी दोघेही लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र स्टेजवर चढले होते. मॅनेजर पूजा ददलानी हात जोडून तिथे उभ्या राहिल्या, तर शाहरुख खानने प्रथम तिथे उभे राहून प्रार्थना केली.
त्यानंतर मास्क खाली सरकवून त्याने खाली वाकून पार्थिव शरीरावर फुंकर मारली. यानंतर शाहरुख खान मॅनेजर पूजा ददलानीसह स्टेजवरून खाली उतरला आणि हात जोडून शरीराची प्रदक्षिणा केली. शाहरूखने घेतलेल्या या आगळ्या वेगळ्या अंत्यदर्शनाकडे सर्वांचेच लक्ष होते.
शाहरुखच्या या पद्धतीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शाहरुखने मास्क खाली करत केलेली कृती म्हणजे तो फुंकून थुंकला असा विचार लोक करत आहेत. अनेकांनी ट्वीटरवर पोस्ट करत शाहरुख खाननं मास्क खाली करुन लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनावेळी तो थुंकला असा दावा केला आहे. काहींच्या मते शाहरुख खानं असं करुन लता मंगेशकर यांचा अपमान केला असल्याची टीकाही केली आहे.
मात्र, हजारोंच्या गर्दीत अशा आदरणीय व्यक्तिमत्त्वाच्या पार्थिवावर थुंकणे कसे शक्य आहे, असे अनेकांनी स्पष्ट करत या गोष्टीचा विरोध केला आहे. तसेच शाहरुख विरुद्ध प्रतिक्रिया देणाऱ्यांना रुबिना लियाकन या मुस्लिम युजर्सनी ट्विट केले आणि सांगितले की शाहरुखने स्टेजवर जे केले त्याला फातिहा पढणं म्हणतात.
वास्तविक, त्याने दुआचे पठण केल्यानंतर फुंकले होते. दुआ म्हटल्यानंतर हळूवार फुंकर घालायची, असी रीत मुस्लिम बांधवांमध्ये असते. शाहरुखनं नेमकं तेच केलं होतं. पण याच गोष्टीवरुन अनेकजण गैरसमज पसरवत आहेत. अनेकांनी शाहरुखला अत्यंत वाईट प्रकारे ट्रोल केलं असल्याचं दिसून येत आहे.
यावेळी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी शाहरुख ची पत्नी गौरी खान देखील तेथे उपस्थित होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी लतादीदींचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनेही लतादीदींचे सपत्निक अंत्यदर्शन घेतले. लतादीदींचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले. शिवाजी पार्कवर जात त्यांनी लतादीदींचे अंत्यदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली.