Share

‘KGF 2’ चा रेकॉर्ड मोडणार शाहरुखचे ‘हे’ चित्रपट? ‘पठाण’ नंतर ‘या’ चित्रपटांद्वारे घालणार धुमाकूळ

Shahrukh Khan

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान (Shahrukh Khan) सध्या माध्यमात फारच चर्चेत आहे. दीर्घकाळ पडद्यापासून दूर राहिलेला शाहरूख लवकरच ‘पठाण’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे शाहरूखचे चाहते त्याच्या पुनरागमनासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. यादरम्यान चाहत्यांची ही उत्सुकता कायम ठेवत नुकतीच शाहरूखने त्याच्या आगामी एका चित्रपटाची घोषणा केली.

‘डंकी’ असे शाहरूखच्या आगामी चित्रपटाचे नाव असून याबाबत त्याने हटके अंदाजात घोषणा केली होती. तर शाहरूखच्या या घोषणेने त्याचे चाहते फारच खुश झाले आहेत. आपला किंग खान आता एकामागून एक चित्रपटाची घोषणा करत आहे. त्यामुळे तो आता पुन्हा चित्रपटात सक्रिय झाला असून त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करतील, अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे.

यादरम्यान आता शाहरूखच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे शाहरूखचा केवळ ‘पठाण’ आणि ‘डंकी’च नाहीतर तर त्याचे इतरही काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर २ हजार करोडपेक्षा अधिक कमाई करत इतिहार रचणार, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तर कोणते आहेत ते चित्रपट जाणून घेऊया.

१. पठाण

‘पठाण’ हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये शाहरुख खान एक जासूसच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरूखसोबत या चित्रपटात जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहेत. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असू २५ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

२. डंकी

शाहरूख खान दिग्दर्शक राजकुमार हिराणींसोबत चित्रपट करणार, याबाबत दीर्घकाळापासून चर्चा सुरु आहे. तर आता शेवटी या दोघांनी आपल्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘डंकी’ असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव असून यामध्ये शाहरूखसोबत अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

३. हे राम

शाहरूख खानने ‘हे राम’ या चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत. दिग्गज अभिनेते कमल हासन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला होता. परंतु, अद्याप या चित्रपटाबाबत कोणताही अपडेट समोर आला नाही.

४. ऑपरेशन खुकरी

‘ऑपरेशन खुकरी’वर आधारित एक चित्रपट शाहरूख घेऊन येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या चित्रपटात शाहरूख एका सैनिकाची भूमिका बजावू शकतो, असेही सांगण्यात येत आहे.

५. सॅल्यूट

भारतीय वायू सेनेचे माजी वैमानिक राकेश शर्मा यांच्या बायोपिकवर आधारित ‘सॅल्यूट’ चित्रपट दीर्घकाळापासून चर्चेत आहे. हा चित्रपट सुरुवातीला आमिर खानला ऑफर करण्यात आला होता. परंतु आमिरने त्यास नकार दिला. त्यामुळे आता अशा बातम्या समोर येत आहेत की, आता या चित्रपटात शाहरूख खान दिसू शकतो.

६. रईस

शाहरूखचा २०१७ साली आलेला ‘रईस’ या चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल ढोलकियासोबत पुन्हा एकदा काम करण्यास शाहरूख उत्सुक आहे. फायर फायटर तुकाराम यांच्यावर आधारित चित्रपटासाठी शाहरूखने राहुल यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे.

७. सनकी/लायन –

दाक्षिणात्य दिग्दर्शक एटली यांचा एक चित्रपट शाहरूखने साईन केल्याचे वृत्त आहे. या चित्रपटाचे नाव ‘सनकी’ किंवा ‘लायन’ असे असू शकते. रिपोर्टनुसार या चित्रपटाचे बजेट २०० कोटी रूपये असून लवकरच शाहरुख चित्रीकरणास सुरुवात करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

८. शाहरूखच्या ‘चक दे इंडिया’ या चित्रपटाचे दिग्दर्शक शिमित अमन पुन्हा एकदा किंग खानसोबत काम करण्यास उत्सुक आहेत. एका रोमँटिक चित्रपटात ते शाहरूखला कास्ट करू इच्छित असल्याचे सांगण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
सुशांत सिंह राजपूतपासून ते सिद्धार्थ शुक्लापर्यंत, या कलाकारांनी मृत्यूनंतर दान केली त्यांची संपत्ती
सामंथासोबत लग्नाच्या आधी नागा चैतन्यचे या अभिनेत्रीसोबत होते अफेअर, नाव वाचून अवाक व्हाल
रिंकू राजगुरूच्या पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो पाहून चाहत्यांना झाली श्रीदेवीची आठवण; म्हणाले, कडक आर्ची

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now