Share

मराठी माणसांपाठोपाठ मारवाडी आणि गुजराती समाजही राज्यपालांवर नाराज; जाहीर टिका करत म्हणाले यांच्यामुळे…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात राजस्थानी गुजराती मुंबईतून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा भाजपसहित सर्व पक्षांनी निषेध केला. राज्यपालांवर टीका केली.

अशातच, ज्यांच्या संबंधाने राज्यपालांचे वक्तव्य होते तो मारवाडी, गुजराथी, राजस्थानी समाजही त्यांच्यावर नाराज झाला आहे. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे आमच्या समाजाबद्दल गैरसमज व द्वेष पसरवला जात आहे असा आरोप या समाजाकडून करण्यात येत आहे.

त्यामुळे विधिमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलावून राज्यपालांना परत पाठविण्याचा ठराव करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांकडे करण्यात आली आहे, ही सर्व माहिती अँड श्याम आसावा यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यपाल चांगलेच अडचणीत आल्याचे बोलले जात आहे.

अँड श्याम आसावा यांनी सांगितले की, राज्यपाल कोश्यारी यांनी मारवाडी, गुजराथी, राजस्थानी लोकांच्या बाबतीत वादग्रस्त व निंदनीय विधान केले. ते सर्वत्र प्रसार माध्यमे व सोशल मिडीयातुन फिरत आहे. घटनात्मक पदावर बसलेल्या या राज्यपालांनी असे बेजबाबदार वक्तव्य सहजपणे होऊ शकत नाही.

तसेच म्हणाले, त्यांच्या या वक्तव्यामुळे विविध जाती धर्मातील लोकांमध्ये गैरसमज व द्वेष पसरून सामाजिक व सौहार्दपूर्ण शांतिपूर्ण वातावरण बिघडले आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. राज्यपालांवर या वक्तव्याबद्दल फौजदारी कारवाई होणे गरजेचे आहे.

परंतु राज्य घटनेतील कलम ३६१ नुसार राज्यपालांना असलेल्या विशेषाधिकारामुळे त्यांच्यावर फौजदारी कारवाई शक्य नाही. त्यामुळे तातडीने विशेष अधिवेशन बोलावून त्यात कोश्यारी यांना राज्यातून परत बोलविण्याचा ठराव करावा. अशी मागणी आसावा यांनी केली.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now