Share

राज ठाकरेंच्या भाषणाचा इफेक्ट, महाराष्ट्रापाठोपाठ ‘या’ ठिकाणी भोंगे लावून हनुमान चालीसा पठण

raj

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्यभरात मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुंबईपाठोपाठ, नाशिकमध्येही मनसे कार्यकर्त्यांनी भोंगे लावून हनुमान चालिसा पठण सुरु केले.

राज्यभरात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी भोंगे लावून हनुमान चालिसा पठण सुरू केले आहे. एवढच काय तर महाराष्ट्रापाठोपाठ आता वाराणसीतही मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. वाराणसीतही लाऊडस्पीकरवरून हनुमान चालिसा पठण सुरू केले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीच्या साकेत नगर परिसरात आंदोलनाचे अध्यक्ष सुधीर सिंह यांनी त्यांच्या घरापासून आंदोलनाची सुरुवात केली आहे. वाराणसीतील श्रीकाशी विश्वनाथ ज्ञानवापी मुक्तिआंदोलनाने लाऊडस्पीकरवरून हनुमान चालिसा पठण सुरू केले आहे.

तसेच मशिदीत अजान सुरू होताच हनुमान चालिसा पठण करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, घराच्या छतांवरही लाऊडस्पीकर लावण्यात आले होते.  समाजात तेढ निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न नसल्याचंही सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना सिंह म्हणाले, ‘जेव्हा अजान सुरू होईल तेव्हा अशाप्रकारे लाउडस्पीकरवरुन हनुमान चालीसाचे पठण केले जाईल, असा गर्भित इशाराच यावेळी बोलताना त्यांनी दिला. यापूर्वीही अनेकदा अजानच्या आवाजावरुन आम्ही आक्षेप घेतला होता, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अनेकदा आम्ही याबाबत तक्रार देखील दिली असल्याचे त्यांनी सांगितले. अजान होत असताना लाउडस्पीकरचा आवाज कमी करावा जेणेकरुन आम्हाला त्रास होणार नाही, अशी तक्रार आम्ही दिली होती, असे त्यांनी म्हटलं आहे. काशीमध्ये पहाटेही मंदिरात वैदित पाठ आणि पूजा- अर्चना व हनुमान चालिसाचे पठण केले जायचे. मात्र, सर्व आता बंद झालं असल्याच त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now