छत्तीसगडमधील (Chhattisgarh News) सरगुजा जिल्ह्यातून काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली आहे. पोटच्या गोळ्यानेच जन्मदात्या आई – वडिलांची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. खुद्द आरोपी मुलानेच पोलिसांना याबाबत कबुली दिली. या प्रकरणी आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे.
तर जाणून घेऊया.. मुलाने एवढं टोकाच पाऊल उचण्यामागच नेमकं कारण काय? ही घटना आहे छत्तीसगडमधील (Chhattisgarh News) सरगुजा जिल्ह्यातील. जयराम सिंह (50) आणि फूलसुंदरी बाई (45) आपल्या लहान मुलासह राहत होते. तर त्यांचा मोठा मुलगा हेमंत जवळील गावा आपल्या सासरी राहतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई-वडील त्याच्यापेक्षा मोठ्या भावावर जास्त प्रेम करीत असल्याचं त्याला वाटत होतं. त्यामुळे मोठा भाऊ सासरीच राहत होता. याच रागातून अल्पवयीन मुलाने 28 फेब्रुवारी रात्री आई-बाबा घरात झोपलेले असताना धारदार शस्त्राने त्यांनी हत्या केली.
धक्कादायक बाब म्हणजे घरात खड्डा खणला आणि मृतदेह घरातच पुरले. आरोपीने ज्या खोलीत आई-वडिलांचा मृतदेह दफन केला होता, त्यात खोलीत तो दररोज स्वयंपाक करून खात होता आणि पुरलेल्या ठिकाणी झोपत होता, अशी माहिती समोर आली आहे. मात्र या प्रकरणी करण्यात आलेल्या तपासादरम्यान आरोपी मानसिकदृष्ट्या विक्षिप्त असल्याचं समोर आलं.
मात्र आठवडाऊपानंतर आरोपीचा मोठा भाऊ घरी पोहोचला. मात्र घरी आई-बाबा नव्हते, त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. घरी दुर्गंध येत असल्यानं त्याने तात्काळ पोलिसांना बोलावलं. पोलिसांच्या टीमने खड्डा खणला आणि दोन्ही मृतदेह बाहेर काढले. हे पाहून नातेवाईकांना तसेच शेजाऱ्यांना देखील जबर धक्का बसला.
दरम्यान, पोलिसांना या प्रकरणाचा शोध सुरू केला आणि तपासादरम्यान मोठा खुलासा झाला. मुलानेच चौकशी दरम्यान आई – वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी मुलाला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘रविवारी शाळेला सुट्टी असते ओ मोदी साहेब, कधी शाळेत गेले असते तर माहीत असतं’
“आज पुण्याच्या आधी मुंबई मेट्रो सुरू झाली असती पण पिता पुत्राच्या अहंकाराने हे होऊन दिले नाही”
बाळासाहेबांनंतर हिंदूह्रदयसम्राट पदवी फडणवीसांना द्यावी, भाजपाची मागणी, शिवसेनेच्या भूमिकेकडे राज्याच लक्ष
‘कोण म्हणतं मी म्हातारा झालो.. मी अजून थकलेलो नाही, तुमची साथ असेपर्यंत हा गाडा सुरूच राहील’