Share

ईशान किशनला लिलावात १५.२५ कोटी मिळाल्यानंतर वडिलांचा वाढला होता बीपी, स्वतः इशानने सांगितला भन्नाट किस्सा

विकेटकीपर फलंदाज इशान किशनला (Ishan Kishan) IPL मेगा लिलावात मुंबई इंडियन्स संघाने 15.25 कोटींना विकत घेतले आहे. ईशान किशनने गौरव कपूरच्या शो ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्सला हजेरी लावली आणि आयपीएल, रोहित शर्मा, एमएस धोनीशी संबंधित सर्व प्रश्नांवर मनमोकळेपणाने बोलला. यादरम्यान ईशान किशनने सांगितले की, जेव्हा तो 6 कोटींसाठी मुंबई इंडियन्स संघात सामील झाला तेव्हा त्याच्या वडीलांना हॉस्पिटलमध्ये जावे लागले होते.(After Ishaan Kishan got Rs 15.25 crore in the auction his father had increased BP)

ईशान किशन म्हणाला, ‘मी चिलआउट होतो, लिलाव माझा होता, मी तणावात असायला हवे होते. मी माझ्या मित्रांसोबत बाहेर होतो, आम्ही फुटबॉल खेळत होतो. लिलाव संपल्यावर मला मोनू भाईचा फोन आला, त्यांनी मला चांगले पैसे मिळाल्याचे सांगितले. मग मी घरी गेलो तर आई कॉल वर गुंतलेली होती, तिचे गाल लाल झाले होते. वडील घरी नव्हते, मी विचारले बाबा कुठे आहेत? आईने सांगितले की ते बीपी तपासण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले आहे. हे सांगताना ईशान किशन हासू आलं.

हिटमॅन रोहित शर्माच्या कर्णधारपदावर बोलताना ईशान म्हणाला की, संपूर्ण सामन्यात रोहित भाईचे मन धावत राहते. इशान म्हणाला की, रोहित सामन्यादरम्यान फक्त एकच शिवी देत असे आणि सामन्या संपल्यानंतर म्हणतो की मन्यादरम्यान असे घडते, कोणीही ते गंभीर घेऊ नका. रोहित भाईची कर्णधार करण्याची ही शैली एकदम मस्त आहे.

इशान किशन म्हणाला की तो धोनीच्या विकेटकीपिंगपेक्षा मी त्यांच्या माइंडवर जास्त लक्ष ठेवतो. इशान किशन म्हणाला, ‘आयपीएलमध्ये मी ज्या तणावाखाली होतो त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. मी चांगला खेळत होतो आणि गोलंदाजांवर जोरदार धुलाई करत होतो. पण, धोनीने बॉलर इम्रान ताहिरशी काहीतरी बोलले आणि माझ्या मनात विचार सुरू झाला की, धोनी भाई त्याच्याशी काय बोलले असेल. त्यानंतर ड्राईव्ह मारल्यानंतर स्पिनर शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने बाद झालो.

ईशान किशनने सांगितली व्हायरल व्हिडिओची कहाणी: या मुलाखतीदरम्यान सचिन तेंडुलकरला समोर पाहिल्यानंतर ईशान किशन त्या व्हायरल व्हिडिओवरही बोलला होता. इशान किशनने सांगितले की, तो ड्रेसिंग रूममध्ये आला तेव्हा त्याच्या तोंडून शिव्या निघाल्या. इशान किशनने सांगितले की, सचिन तेंडुलकरही तिथे बसल्याचे त्याने पाहिले आणि सचिनला पाहताच त्याने पटकन चष्मा काढला आणि सचिनला शुभ दुपारच्या शुभेच्छा दिल्या.

महत्वाच्या बातम्या-
ईशान किशनची गर्लफ्रेंड दिसते लाखात एक, बॉलिवूड अभिनेत्रीही पडतील फिक्या, पहा फोटो
ईशान किशन आणि श्रेयस अय्यरने धु धु धुतलं, भारताने सलग १० वा टी-२० सामना जिंकला
भरमैदानात नक्की काय घडलं होतं की इशान किशन करावं लागलं रुग्णालयात दाखल; पहा व्हिडिओ
VIDEO: सामना सुरु असतानाच इशान किशनला करावं लागलं रुग्णालयात दाखल; पहा नक्की काय घडलं

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now