Social media, video, father, daughter/ वडील आणि मुलीच्या नात्याशी संबंधित अनेक गोंडस आणि क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. नुकताच असाच एक व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. वडील आणि मुलीचे नाते (Relationship) खूप खास असते. वडिलांपेक्षा मुलींना त्यांच्या भावना कशा व्यक्त करायच्या हे चांगले कळते आणि हा व्हिडिओ तेच सिद्ध करतो.
या व्हिडिओमध्ये शाळेच्या ड्रेसमध्ये (School Dress) एक चिमुरडी डोळ्यांवर हात ठेवलेली पाहायला मिळू शकते. समोर तिचे वडील स्विगीचा टी-शर्ट हातात घेऊन उभे आहेत. खरं तर, वडिलांना नवीन नोकरी मिळाली आहे, ज्याबद्दल त्यांना अशा प्रकारे एक सरप्राईज देऊन आपल्या मुलीला सांगायचे आहे. आधी तुम्ही पण पहा हा व्हिडीओ…
मुलीने डोळे उघडताच, तिच्या वडिलांकडे स्विगी टी-शर्ट धारण केलेले पाहून ती आनंदाने उडी मारते. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही मुलीच्या आनंदाची कल्पना करू शकता. मुलगी उत्साहात उड्या मारू लागते आणि पळत जाऊन वडिलांना मिठी मारते. आपल्या मुलीची अशी प्रतिक्रिया पाहून वडिलांच्याही चेहऱ्यावर हसू उमटते. मुलीच्या या गोंडस प्रतिक्रियेने अनेकांची मने जिंकली.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ लोकांचे खूप मनोरंजन करत आहे. आत्तापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. इतकेच नाही तर हजारो लोकांनी (Social Media Users) व्हिडिओला लाइकही केले आहे. अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आले तर अनेक यूजर्सने कमेंटही केल्या.
महत्वाच्या बातम्या-
Bollywood: जान्हवीच्या शॉर्ट्समधील फोटोंनी घातला सोशल मीडियावर धुमाकूळ, लोकं म्हणाली, कोणी एवढं सुंदर कसं असू शकतं
राजकीय रंगात रंगलेला गणेशोत्सव! छोटे एकनाथ शिंदे सोशल मीडियावर व्हायरल, वाचा नेमकं काय केलं छोटया शिंदेंनी
Virat kohli : विराटच्या चुकीमुळे जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला सुर्यकुमार झाला आऊट? सोशल मीडियावर होतोय ट्रोल, ‘त्या’ ओव्हरमध्ये काय घडलं?