Share

तिसऱ्यांदा लग्न केल्यानंतर ११ व्या बाळाला जन्म द्यायला सज्ज झाली ‘ही’ अभिनेत्री, चर्चांना उधाण

प्रत्येक महिला तिच्या आयुष्याच्या एका टप्प्यावर ‘आई’ होण्याचं स्वप्न पाहते. मातृत्व सुख हे प्रत्येक महिलेला परिपूर्ण करणारं असतं, असं म्हणतात. त्यामुळे स्वतःच एकतरी मूल असावं अशी इच्छा महिलेला असते. मात्र, आता आम्ही तुम्हांला अशा एका महिलेविषयी सांगणार आहे जी एक अभिनेत्री सोबतच गायिका असून, ती आता तिच्या 11 व्या बाळाला जन्म देणार आहे.

होय, हे खरं आहे. ही अभिनेत्री तिच्या 11 व्या बाळाला जन्म देणार आहे. आधीच दहा मुलांची आई असणारी ही अभिनेत्री आणि गायिका 11 व्या वेळी गर्भवती आहे. सोशल मीडियावरून तिनं ही बातमी चाहत्यांसमोर शेअर केली आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये प्रेग्नन्सी शूटचा फोटो व्हायरल केला आहे.

11 व्या बाळाला जन्म देणाऱ्या या अभिनेत्रीला पाहून चाहते थक्क झाले आहेत. या अभिनेत्रीचे नाव केके वँट असं आहे. पतीचं नाव जकारिया डेव्हिड डेरिंग आहे. केके आणि जकारिया डेव्हिड 2018 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. याआधी तिनं दोन लग्न केली होती. वयाच्या 18 व्या वर्षी तिनं रेहमत मॉर्टन यांच्याशी लग्न केलं होत, मात्र 2009 मध्ये ते वेगळे झाले.

या लग्नातून त्यांना तीन मुलं झाली. त्यांनतर केकेनं 2011 मध्ये मायकल जमार फोर्डशी लग्न केलं. यांच्या नात्यातूनही 3 मुलांचा जन्म झाला. पुढे 2017 पर्यंत केके 8 मुलांची आई झाली. त्यानंतर या लग्नात देखील अपयश आले,आणि तिनं 2018 मध्ये आपला बालमित्र आणि एक्स बॉयफ्रेंड जकारिया डेरिंग याच्याशी लग्न केलं.

जकारिया डेरिंगच्या बरोबरच्या लग्नातून तिला दोन मुलं झाली. आता त्याच्यापासून तिला तिसरं मूल होणार आहे. म्हणजेच ती आता 11 व्या बाळाची आई होणार आहे. सोशल मीडियावर तिनं तिचे प्रेग्नन्सी चे फोटो शेअर केले. ‘पती जकारिया डेव्हिड डेरिंग आणि मी हे जाहीर करते की आमच्या कुटुंबात आणखी एल लहान मुल येणार आहे. हे माझं 11 वं बाळ असणार आहे’, असं तिनं फोटोखाली कॅप्शन दिलं आहे.

तिच्या या पोस्टला चाहत्यांनी प्रचंड प्रतिक्रिया दिल्या आहेत. ती 11 व्या बाळाची आई होणार मात्र तिच्या शरीरयष्टीकडे पाहून कोणालाच यावर विश्वास बसत नाही. अजूनही या अभिनेत्रीने आपले शरीर जपले आहे. 11 व्या बाळाला जन्म देणार असली, तरीही त्या गोष्टीचा तिच्या शरीरावर परिणाम झाला नसल्याने चाहते तिला पाहून थक्क झाले आहेत.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now