Share

uddhav thackeray : आमदार पाटलांची कमाल! केले तब्बल दोन लाख शेतकऱ्यांचे भले, होणार हजारो कोटींचा फायदा

kailas patil

uddhav thackeray : ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केलेल आमरण उपोषण सध्या चर्चेचा विषय बनला आहे. गेल्यासात दिवसांपासून पाटील यांनी वेगवेगळ्या मागण्यांसाठी उपोषण केले होते. अखेर सातव्या दिवशी त्यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. तसेच पाटील यांची उपोषणाची दखल शासन, प्रशासनानं घेतली आहे.

गेल्या सहा दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कैलास पाटील आमरण उपोषण करत होते. शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा तसेच अतिवृष्टीनं झालेली नुकसान भरपाई मिळावी, यासाठी हे आंदोलन सुरू होतं. राज्यसरकारनं अनेक मागण्या मान्य केल्या असल्याची माहिती मिळाली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा झाल्यानंतर पाटील यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कैलास पाटील यांच्याशी चर्चा केली. यसेच जिल्हाधिकारी यांच्याशी देखील चर्चा केली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पाटील यांची भेट घेतली.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या आश्वासनानंतर आणि प्रशासनाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर कैलास पाटील यांनी उपोषण तात्पुरतं स्थगित केले आहे. एवढंच नाही तर पाटील यांच्या आमरण उपोषणाची  जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेतल्याने आता या आंदोलनात तोडगा निघण्याची शक्यता आहे.

दरम्यान, धाराशिव जिल्हयातील शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा, अनुदान आणि ओला दुष्काळ जाहीर करावा या मागण्यांसाठी पाटील हे उपोषण करत होते. २०२० च्या पीक विम्याची ५३१ कोटी रुपये जिल्ह्यातील तीन लाख ५७ हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

याशिवाय २०२१ सालच्या पीकविम्याची उर्वरित ५० टक्के म्हणजेच ३८८ कोटी रुपयांची रक्कम विमा पात्र सहा लाख ६७ हजार २८७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे, अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या मागण्यांसाठीच पाटील यांनी उपोषण केले होते.

महत्वाच्या बातम्या  
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी… 
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई 
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर 
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now