Share

दिल्ली पंजाबनंतर आपने मध्यप्रदेशातही भाजपला गाडले; मिळवला ऐतिहासीक विजय

महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी होत असताना दुसरीकडे मध्यप्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची रणधुमाळी चालू आहे. तेथील काही भागात महानगरपालिका निवडणूका पार पडल्या असून काल पहिल्या टप्प्यातील निकाल लागला आहे.

मध्यप्रदेशमधील ११ महानगरपालिका, ३६ नगरपालिका आणि ८६ नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. येथील इंदौर, जबलपूर, भोपाळ, सागर, सतना, सिंगरौली, छिंदवाडा, खंडवा, बुरहानपूर आणि उज्जैन या महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत.

काल पहिल्या टप्प्यातील निकाल लागला आहे. यामध्ये ‘आप’ ने एका महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवला असून मध्यप्रदेशमध्ये आपल्या पहिल्या महापौरची जागा निश्चित केली आहे. या विजयामुळे आप ने मध्यप्रदेशमध्ये आपले पाय रोवायला सुरुवात केली अशी चर्चा सुरू आहे.

येथील सिंगरौलीच्या महापौर म्हणून आप च्या राणी अग्रवाल या विजयी झाल्या आहेत. मध्यप्रदेशमधील या विजयानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत निवडून आलेल्या राणी अग्रवाल यांचे अभिनंदन केले आहे. सध्या आप च्या या विजयाची सर्वत्र चर्चा आहे.

अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केलं आहे की, मध्य प्रदेशातील सिंगरौली महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी विजयी झालेल्या आप उमेदवार राणी अग्रवाल यांच्यासहित सर्व विजेते व कार्यकर्त्यांचे खूप खूप अभिनंदन, असं ट्विट केजरीवाल यांनी केलं आहे.

सिंगरौली महानगर पालिकेवर ‘आप’च्या राणी अग्रवाल यांनी भाजपच्या उमेदवाराला पराभूत करून विजय मिळवला आहे. सिंगरौली महानगरपालिका याआधी भाजपच्या हातात होती पण आता ‘आप’ ने विजय मिळवत मध्यप्रदेशमध्ये आपला पहिला उमेदवार निवडून आणला आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now