शनिवारपासून आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. परंतु रविवारच्या पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला धुळ चारली आहे. 2013 पासून मुंबई इंडियन्स पहिल्या खेळीत पराभवाचा सामना करत असताना देखील संघ मागे हटलेला नाही. त्यामुळे त्यांची ही ठाम भूमिका आणि जिद्द पाहून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे.
आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात झाल्यापासून चाहते आपल्या आवडत्या संघाच्या बाजूने उभे राहत दुसऱ्या संघाची खेचताना दिसत असतात. या पार्श्वभूमीवर नुकतेच एका नेटकऱ्याने पहिला सामना जिंकला नाहीये, तर संपूर्ण टूर्नामेंट जिंकलायची असल्याची पोस्ट मुंबईची बाजू घेत केली आहे.
After #DC win #Pant to #RohitSharma𓃵
bhar jakar wada pav kaho Bhai 🤣🤣🤣#DCvMI pic.twitter.com/UJwneKrENr— Hindu rastra ❤️🚩 (@prashanthk99) March 27, 2022
तर याला टकर देत दुसऱ्या नेटकऱ्याने रोहितची खिल्ली उडवत, ‘रोहित शर्मा पराभवानंतर, आमचं असचं असतं’ असे मीम्स शेअर केले आहेत. यासोबतच, मुंबई पहिला सामना हरूनही 5 वेळा आयपीएल जिंकली असल्याच एका नेटकऱ्याने मीम्समधून म्हटल आहे.
इतकेच नव्हे तर, पंत रोहित शर्माला जा, जाऊन वडापाव खाऊन ये, असा सल्ला एका नेटकऱ्याने दिला आहे. या मजेशीर मीम्सचा आनंद सर्वजनच लूटताना दिसत आहेत. आयपीएल सुरु झाली की मीम्स व्हायरल होण्यास सुरुवात होते.
Mumbai indians as always ✨💙.#MIvsDC #RohitSharma𓃵 pic.twitter.com/cQy9k4BsUl
— Nagendra singh chouhan🥀💖 (@k_p_7773) March 27, 2022
2013 पासून मुंबई इंडियन्सने आयपीएलचा पहिला सामना जिंकला नाही. त्यांनी ही एक परंपराच पाडली असल्याचे चाहते सांगताना दिसतात. यापूर्वी मुंबईने पहिला सामना 2012 मध्ये जिंकला होता. त्यानंतर कोणताच पहिला सामना मुंबईला जिंकता आला नाही.
#MumbaiIndians #MIvsDC #DCvMI #RohitSharma𓃵 pic.twitter.com/lDZhdZGXiU
— 🇮🇳 (@abyjyth) March 27, 2022
त्यामुळे नेटकरी यावर चांगलीच खिल्ली उडवताना दिसतात. आता नेटकऱ्यांची ही टिंगल थांबण्यासाठी मुंबईला 16 व्या सामन्याची वाट बघावी लागणार आहे. तोपर्यंत या मीम्सला संघाला झेलावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
मराठी सिनेसृष्टीतील ‘या’ जोडप्याने केले गुपचूप लग्न; फोटो झाले व्हायरल
सरदेसाईंसमोरच युवासेनेच्या दोन गटांत राडा, एकमेकांचे कपडे फाडत केली हाणामारी; पहा व्हिडीओ
हिरो स्प्लेंडरचे इलेक्ट्रिक व्हर्जन होणार लाँच, २४० किमी असेल रेंज; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत
राज्याला आज सर्वात स्वच्छ आणि इमानदार मुख्यमंत्री लाभला; वरुण सरदेसाई यांनी केले तोंड भरून कौतुक