Share

Nurse: काय सांगता? कोमातून बाहेर आल्यानंतर नर्स म्हणाली, मला देव भेटला; डॉक्टरांनाही दिला ‘हा’ पुरावा

Nurse, Medicine, God, Coma,/ जितके रोगांचे प्रकार वाढत आहेत, तितकी वैद्यकीय शास्त्रात प्रगती झाली आहे आणि जवळपास सर्वच आजारांवर उपचार आता शक्य झाले आहेत. पण कधी कधी असे काही चमत्कार घडतात ज्यामुळे लोकांचा निसर्ग आणि देवावरील विश्वास कमी होत नाही. अमेरिकेतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका नर्सने तिला देव भेटल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही तर याचा पुरावा आपण डॉक्टरांना दिल्याचेही तिने सांगितले.

वास्तविक ही घटना अमेरिकेतील आहे. वृत्तसंस्थेच्या एका रिपोर्टमध्ये सांगितले की, पेनी विटब्रोड नावाच्या नर्सला अचानक श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला आणि नंतर ती गंभीर आजारी पडली. तिच्या कुटुंबीयांनी तिला मोठ्या रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर डॉक्टरांचे प्रयत्नही कमी पडले आणि त्यानंतर ती कोमात गेली. तिला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते.

दरम्यान, एके दिवशी अचानक ती कोमातून बाहेर आली. कोमातून बाहेर आल्यानंतर, कोमात गेलेली तेव्हा तिला देव भेटल्याचा दावा नर्सने केला आहे. महिलेच्या या दाव्याने सर्वांनाच धक्का बसला. ती म्हणाली की, तिच्या आत्म्याने पुन्हा येण्यापूर्वी तिचे शरीर सोडले होते. पृथ्वीवरील लोक वेळेचे बांधील आहेत. यानंतर ती देवाला भेटली. तिला प्रथम एक चमकणारा प्रकाश दिसला आणि नंतर देव तिच्या समोर प्रकट झाला.

देवाने तिला सांगितले की, तिने आणि तिच्या कुटुंबाने त्यांच्या जीवनात ज्या अडचणी आणि दु:खांचा सामना करावा लागला त्याबद्दल देवाला रागाने सांगितले. देवाने याचे उत्तर दिले आणि सांगितले की, इहलोकातील दु:खाचे फळ परलोकात मिळते आणि त्यांना शांती मिळते. एवढेच नाही तर तिने सांगितले की कोमात असताना तिच्या आजीचा आत्मा देखील अचानक प्रकट झाला आणि तिला शांत राहण्यास सांगून धीर दिला.

रिपोर्टनुसार, एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोमातून परत आल्यानंतर ती पूर्णपणे निरोगी झाली आणि उठली. देव भेटल्याचा पुरावा आपण डॉक्टरांना दिल्याचेही तिने सांगितले. मात्र, कोणते पुरावे दिले आहेत हे सांगितले नाही.

महत्वाच्या बातम्या-
Abdul Sattar : अब्दुल सत्तार नावाचा प्राणी मंत्री होतोय हे दुर्दैव; ते यापुर्वीही ‘या’ मंत्र्यांच्या अंगावर धावून गेलेत’
कोरोना झालेली नर्स ४५ दिवसांपासून गेली होती कोमात, व्हायग्राचा एक हेवी डोस देताच आली शुद्धीवर
गणेश नाईक मला नर्सचा किंवा शालेय विद्यार्थीनीचा गणवेश घालायला लावायचे अन्…; महिलेचा गंभीर आरोप

ताज्या बातम्या आरोग्य इतर

Join WhatsApp

Join Now