Share

IPL 2022: चेन्नईचा सलग तिसरा पराभव झाल्यानंतर चाहत्यांना आठवला रैना, होतेय ‘ही’ मागणी

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या या सिजनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ला त्यांचा जुना खेळाडू सुरेश रैनाची उणीव भासत आहे. याचे कारण चालू सिजनमध्ये चेन्नई संघाची अवस्था बिकट झाली आहे. त्यांनी पहिले तीन सामने गमावले आहेत. रविवारी चेन्नई संघाचा आयपीएलमधील धावांच्या बाबतीत दुसरा सर्वात मोठा पराभव झाला आहे.(After Chennai’s third consecutive defeat, fans remembered Raina)

या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 8 गडी गमावून 180 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईचा संघ 18 षटकांत 126 धावांवर गार झाला. या घडामोडीत चेन्नईचा संघ हा सामना 54 धावांनी हरला. आयपीएलमधील चेन्नईचा हा दुसरा सर्वात मोठा पराभव आहे. CSK चा सर्वात मोठा पराभव 2013 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध झाला होता. त्यावेळी चेन्नई संघाला 60 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

चेन्नई संघाची अवस्था 2020 च्या आयपीएल हंगामासारखी तर होणार नाही ना, अशी भीती आता चाहत्यांना वाटत आहे. त्या सिजनमध्ये, चेन्नई संघाने 14 पैकी केवळ 6 सामने जिंकले होते आणि  7 व्या क्रमांकावर होते. सुरेश रैना काही घरगुती कारणामुळे त्या हंगामातही आयपीएलमध्ये खेळला नव्हता.

आता चालू म्हणजेच 2022 च्या सिजनमध्ये, चेन्नई फ्रँचायझीने सुरेश रैनाला कायम ठेवले नाही किंवा त्याला मेगा लिलावात विकत घेतला नाही. यावेळी रैनाला लिलावात एकही खरेदीदार मिळाला नाही. अशा स्थितीत चेन्नईच्या संघात रैना विना सर्व व्यर्थ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सुरेश रैनाला मिस्टर आयपीएल म्हणूनही ओळखले जाते.

रैनाने चेन्नई संघासाठी 200 सामने खेळले असून 195 डावात 33.10 च्या सरासरीने 5529 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 138.91 राहिला आहे. CSK कडून खेळताना रैनाने दोन शतके आणि 38 अर्धशतके झळकावली आहेत. चेन्नई संघाला दोन वर्षांसाठी (2016-17) मध्येच निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर रैनाने गुजरात लायन्सकडून 5 सामने खेळले. आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा रैना चौथ्या क्रमांकावर आहे.

रैनाने आतापर्यंत एकूण 205 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 32.51 च्या सरासरीने 5528 धावा केल्या आहेत. गेल्या आयपीएल हंगामात, रैनाने चेन्नई सुपर किंग्जकडून 12 सामने खेळले, 17.77 च्या खराब सरासरीने केवळ 160 धावा केल्या. त्या सिजनमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 54 होती. रैनाची कामगिरी खराब झाली असेल, पण गेल्या मोसमात चेन्नईचा संघ चॅम्पियन होता.

 ऐसा पहली बार था जब रैना को आईपीएल में कोई खरीदार नहीं मिला. फिलहाल सुरेश रैना आईपीएल 2022 में कमेंटेटर के रूप में नजर आ रहे हैं.

 रैना सोाल मीडिया पर जमकर ट्रेंड हो रहे हैं. फैंस का तो यहां तक कहना है कि सीएसके को रैना को उनकी बल्‍लेबाजी के लिए नहीं बल्कि लकी चार्म के लिए बेस प्राइस में खरीद लेना चाहिए.

रैनाला आयपीएलमध्ये खरेदीदार न मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. सध्या सुरेश रैना आयपीएल 2022 मध्ये कमेंटेटर म्हणून दिसत आहे. रैना सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड होत आहे. चाहत्यांनी असे देखील म्हटले आहे की CSK ने रैनाला त्याच्या फलंदाजीसाठी नव्हे तर त्याच्या लकी चार्मसाठी आधारभूत किमतीत खरेदी करावे. सीएसकेच्या तिसऱ्या पराभवावर चाहत्यांनी सांगितले की, रैनाच्या नावावर पुनर्विचार करण्याचा हा तिसरा इशारा आहे.

महत्वाच्या बातम्या-
लवकरच अंकिता लोखंडेच्या घरीही हालणार पाळणा? लॉकअपमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाली..
हत्या करून मृतदेह लोखंडी पाईपला लटकावला; धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं!
सोशल मिडीयावर व्हायरल झालेले हे फोटो पाहून २२ कोटी श्रीलंकन नागरिक संतापले, दिल्या अशा प्रतिक्रिया
कोल्हापूरमध्ये प्रचार करत असताना अज्ञात व्यक्तीने माझा पाठलाग केला, मी ज्या ज्या ठिकाणी सभा घेते त्या ठिकाणी

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now