आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी आणि अभिनेत्री सुष्मिता सेन यांची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. ललित मोदी यांनी अभिनेत्री सुष्मिता सेन सोबतचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. ललित मोदींनी या फोटोला दिलेल्या कॅप्शनची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
सध्या ललित मोदी आणि सुष्मिता सेन हे दोघे मालदीव मध्ये सुट्टी घालवताना दिसत आहेत. ललित मोदी यांनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंसोबत ललित मोदी यांनी कॅप्शन लिहीलं आहे त्यामध्ये त्यांनी सुष्मिता सेनला बेटर हाफ असं म्हटलं आहे.
यानंतर आता त्यांच्या विवाहाची चर्चा सोशल मिडीयावर रंगली आहे. मात्र ललित मोदी यांनी या चर्चांना उत्तर दिले आहे. अद्याप आम्ही लग्न केलेले नसून आम्ही एकमेकांना डेट करत असून लग्नाचा दिवस देखील लवकरच उजाडेल असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
सोशल मीडिया वापरकर्ते आणि सुष्मिता सेनच्या चाहत्यांसाठी हा आश्चर्याचा धक्का ठरला आहे. ललित मोदींच्या पोस्टवर सोशल मीडिया वर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दोघेही एकमेकांना डेट करत आहेत यावर बऱ्याच जणांचा विश्वास बसत नाही, मात्र दुसरीकडे चाहते दोघांचेही अभिनंदन करत आहेत.
Just back in london after a whirling global tour #maldives # sardinia with the families – not to mention my #betterhalf @sushmitasen47 – a new beginning a new life finally. Over the moon. 🥰😘😍😍🥰💕💞💖💘💓 pic.twitter.com/Vvks5afTfz
— Lalit Kumar Modi (@LalitKModi) July 14, 2022
दरम्यान, उद्योगपती आणि आयपीएलमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे ललित मोदी हे प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनशी विवाहबद्ध झाले आहेत अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र अजुन या सगळ्यात अभिनेत्री सुष्मिता सेनकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
ललित मोदींनी त्यांचा इन्स्टाग्राम प्रोफाइल फोटो बदलला आहे. या फोटोमध्ये ते सुष्मिता सेनसोबत दिसत आहे. पार्श्वभूमीत समुद्र दिसतो. इंस्टाग्राम बायोमध्ये ललित मोदींनी लिहिले आहे की त्यांनी नवीन आयुष्य सुरू केले आहे, तेही सुष्मिता सेनसोबत. याशिवाय तिला ‘माय लव्ह’ असे संबोधले आहे.