तुम्हाला कधी विमानतळावर फ्लाइटची वाट पाहण्याची संधी मिळाली असेल, तर हा अनुभव किती वेगळा आहे हे तुम्हाला नक्की माहीत आहे. होय, तुम्हाला विमानतळावर सर्व प्रकारचे लोक बघायला मिळतात. काही प्रवासी त्यांच्या पहिल्या प्रवासाबद्दल खूप उत्सुक असतात, तर अनेकजण खाणे, पिणे आणि खरेदी करताना दिसतात. तर काही प्रवाशांना त्यांच्या फ्लाइटमध्ये पटकन बसायचे असते.(after-a-quarrel-with-his-wife-the-husbands-condition-worsened-and-he-was-living-at-the-airport)
पण तुम्ही कधी विमानतळावर थांबल्याचं ऐकलं आहे. एक चिनी व्यक्ती आहे, त्याला आपल्या कुटुंबापासून दूर राहायचे होते. त्यामुळे गेल्या 14 वर्षांपासून तो बीजिंग(Beijing) आंतरराष्ट्रीय विमानतळावर राहत आहे. वेई जिआंगुओ असे या व्यक्तीचे नाव आहे. तो बीजिंगचा आहे आणि 2008 मध्ये पत्नीशी भांडण झाल्यानंतर घर सोडले होते.
तेव्हापासून बीजिंग कॅपिटल इंटरनॅशनल एअरपोर्ट(Beijing Capital International Airport) त्याच्यासाठी घरासारखं झालं आहे. या विमानतळावर तीन टर्मिनल आहेत आणि तो टर्मिनल 2 येथे राहतात. मात्र, सुरुवातीला तो काही दिवस रेल्वे स्थानकावरही झोपला. या बेरोजगार माणसाला विमानतळावर राहणे आवडते.
तो म्हणतो की इथे तो त्याच्या इच्छेनुसार खाऊ-पिऊ शकतो. त्यानी सांगितले की, ‘मी घरी परतणार नाही, कारण मला तिथे स्वातंत्र्य नाही. माझ्या कुटुंबीयांनी सांगितले की, जर मला घरी राहायचे असेल तर मला सिगारेट आणि दारू सोडावी लागेल.
जर मी असे केले नाही तर मला त्यांना दरमहा 1 हजार युआन (सुमारे 12 हजार रुपये) सरकारी भत्ता द्यावा लागेल. पण मग मी स्वतःसाठी सिगारेट आणि दारू कशी विकत घेणार?’ त्या व्यक्तीचे घर विमानतळापासून 19 किलोमीटर अंतरावर आहे. घरातून आणलेल्या इलेक्ट्रिक कुकरच्या सहाय्याने या व्यक्तीने स्वतःचे छोटेसे स्वयंपाकघरही बनवले आहे.
पूर्वी तो त्याच्या आवडीचे खाद्यपदार्थ घेण्यासाठी विमानतळावर फेऱ्या मारत असे. त्याला कामावरून काढून टाकण्यात आले आणि दर महिन्याला त्याला सरकारी अनुदान मिळाले, ज्याची रक्कम सुमारे 1,000 युआन होती. तसे, जिआंगुओ विमानतळावर फक्त वेई राहत नाही. इराणमधील मेहरान करीमी नासेरी हे निर्वासित होते जे पॅरिस(Paris) चार्ल्स डी गॉलमधील टर्मिनलवर 18 वर्षे राहत होते.