मुंबई | सध्या बॉलीवूडमध्ये अनेक मनोरंजक घडामोडी तसेच धक्कादायक खुलासे होतांना दिसत आहे. तसेच बॉलीवूडमधील अनेक कपल्सना लग्नाचे वेड लागले आहे. दिपिका-रणवीर, प्रियांका-निक यांच्या पाठोपाठ आता कतरिना कैफ आणि विकी कौशल देखील लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. कतरिना आणि विकीचे लग्न मात्र सर्वांना आश्चर्यचकित करणारे होते.
बॉलीवूडमध्ये असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत जे त्यांचे नाते सर्वांसमोर मान्य करण्यास तयार नसतात. तर काही कलाकार गुपचूप लग्न करून टाकतात. बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्याचं लग्न कधी झाले आणि घटस्पोट कधी झाला याबाबत कुणाला पत्ता देखील लागत नाही. अशाच्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची बातमी आता समोर आली आहे.
विवाह, इश्क-विश्क, प्यारे मोहन, मै हु ना, यांसारख्या चित्रपटात काम करून आपल्या आदांनी लाखो चाहत्यांना अमृता रावने वेड लावले होते. याच अमृता रावने आता सोशल मिडीयावर आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत हजारो चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले आहे.
अभिनेत्री अमृता रावने ९ वर्षापूर्वी गुपचूप प्रेम विवाह केला होता. याबद्दल अमृताने २०१६ साली खुलासा केला होता. मात्र अमृताने आर.जे अनमोलसोबत २०१४ सालीच कुणाला न सांगता गपचूप लग्न करून सर्वांचा मोठा धक्का दिला होता. मात्र आता तब्बल ९ वर्षानंतर अमृताने आता पहिल्यांदा तिच्या लग्नाचा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
लग्नाचे फोटो शेअर करत अमृताने आणि आर.जे अनमोलने त्यांच्या लग्नाच्या गुपितामागचे रहस्य आज उघड केले आहे. सोशल मिडीयावर फोटो शेअर करत अमृताने सांगितले, आमच्या लग्नाचा आमच्या दोघांच्या करियरवर काही परिणाम होऊ नये यासाठी आम्ही आमचे लग्न गुपित ठेवले.
अमृतानंतर अनमोलने देखील अनेक खुलासे केले. अनमोलने सांगितले, मी अमृताला लग्नासाठी विचारले होते मात्र त्यावेळी तिने मला नकार दिला. कारण त्यावेळी अमृताला ३ मोठ्या प्रोडक्शन हाउस कडून फिल्मसाठी ऑफर आल्या होत्या. त्यामुळे तिने मला लग्नासाठी नकार दिला होता.
मात्र त्यानंतर मी तिला गुपचूप लग्न करण्याची कल्पना दिली आणि तिलाही ती कल्पना पटली आणि त्यानंतर २०१४ साली आमचे लग्न झाले. आणि आज अभिनेत्री अमृता राव आणि आर.जे अनमोल हे एका मुलाचे आई-वडील झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
महाविकास आघाडीही बदला घेण्याच्या तयारीत; दरेकरांपाठोपाठ ‘या’ भाजप नेत्यावर फास आवळला
सलमान आणि अमिर खानचे चित्रपट बायकॉट करा; ‘द काश्मिर फाईल्स’ पाहून लोकांची मागणी
२०० किमीची रेंज, २ तासात फुलचार्ज; भारतात लाँच होणार १ लाखापेक्षा कमी किंमत असलेली इलेक्ट्रिक बाईक
RTO पथकाच्या हलगर्जीपणामुळे अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू; लोकांनी पुर्ण पथकालाच चोपले