‘आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होतील असे भाकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच वर्तवले होते. तसंच कोणत्याही गोष्टीवर टीका करण्यात भाजपचे काही लोक आघाडीवर असून त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा असा टोलाही संजय राऊत यांनी यांनी लगावला होता. (after 2 cm meet uddhav thackeray can he become a prime minister of india)
याबरोबर भविष्यात ज्या घडामोडी घडतील त्याच्या भूकंपाचे केंद्रबिंदू शिवसेना भवन असेल असा गौप्यस्फोटही राऊतांनी केला होता. सध्या राजकीय वर्तुळात राऊतांच्या या भविष्यवाणीची जोरदार चर्चा सुरू आहे. रविवारी (20 फेब्रुवारी) तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
के. चंद्रशेखर राव सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांना वर्षा निवासस्थानी जाऊन भेटले. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि के. चंद्रशेखर राव यांनी पत्रकार परिषद घेतली. देश ज्या पद्धतीने चालवला जात आहे ते योग्य नाही, विकासाच्या मुद्यावर एकत्र काम करायला हवं, अशी भूमिका तिन्ही नेत्यांनी मांडली.
यावेळी बोलताना केंद्रातून भाजपला सत्तेतून घालवण्याच्या आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्रातून झाली असल्याचे संकेत त्यांनी दिले. तसेच केसीआर यांच्या भेटीनंतर आता या लढाईचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे येणार का? असा सवाल सध्या उपस्थित झाला आहे. तसेच केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपविरोधात तिसरी आघाडी निर्माण करण्याचे संकेत केसीआर यांनी दिले.
विशेष बाब म्हणजे, या दोन्ही भेटी म्हणजे नव्या मोर्चाची सुरुवात आहे आणि आम्ही लवकरच पुन्हा भेटू असंही ते म्हणाले. पुढची भेट उद्या-परवाच होऊ शकते, असंही ते म्हणाले. या भेटी आताच आणि एवढ्या वेगाने का होत आहेत? याबद्दल सध्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
दरम्यान, यापूर्वी शिवसेनेने देखील उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान पदाबद्दलचा आशावाद बोलून दाखवला होता. अशातच आता ममता बॅनर्जी आणि केसीआर यांच्या भेटीने पुन्हा एकदा संजय राऊत यांचे हे विधान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यामुळे ठाकरेंच्या रुपाने महाराष्ट्राला पंतप्रधान पदाचा मान मिळणार का? हे लवकरच स्पष्ट होईल.
महत्त्वाच्या बातम्या
सुर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरचा ईडन गार्डनवर धमाका! १५ वर्षे जुना रेकॉर्ड मोडला
फोटोशूट भोवलं! ‘मला माझं बाळ आणून द्या,’ आईच्या एका चुकीमुळे बाळाचा बुडून मृत्यु
मुलगी झाली हो! तब्बल दीड क्विंटल जिलेबी वाटून समाजापुढे ठेवला नवा आदर्श, स्त्री जन्माचे अनोखे स्वागत
विहीरीजवळ नाचगाणे करणे पडले महागात, 13 जणांचा विहीरीत पडून मृत्यु, ऍम्बुलन्सलाही झाला उशीर