Share

लग्नानंतर 16 वर्षांनी प्रभुदेवाचं ‘या’ अभिनेत्रीवर जडलं प्रेम, पत्नीशी घटस्फोट घेताच आयुष्यात आला भलताच ट्विस्ट

अभिनेता, डान्सर आणि दिग्दर्शक अशा बहुविध भूमिका साकारणारा प्रभूदेवा समोर आला की, त्याच्या हेवा वाटल्याशिवाय राहत नाही. प्रभूदेवाने आपल्या करिअरची सुरुवात कोरिओग्राफर म्हणून केली होती. तो अनेकवेळा मीडियासमोर आला, पण तो कधीही आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलला नाही. प्रभूदेवाचे जीवन वादांनी भरलेले आहे. ही पडद्यामागील गोष्ट कोणालाही माहिती नाही.

लग्नाच्या 16 वर्षानंतर, तो पुन्हा प्रेमात पडला, ज्यासाठी त्याने आपल्या पत्नीला घटस्फोट देखील दिला. त्यानंतर त्याच्या आयुष्याने वेगळच वळण घेतलं. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. प्रभूदेवाच्या बाबतीतही असेच घडले. लग्नाच्या 16 वर्षानंतर, जिच्यासाठी त्याच्या हृदयाची धडधड होत होती, तिच्यासाठी त्याने आपल्या पत्नीपासून घटस्फोट देखील घेतला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी प्रभूदेवाला तीन मुलं होती. प्रभूदेवा तामिळ चित्रपट ‘विल्लू’ मध्ये नयनताराची कोरिओग्राफी करत होता, त्यादरम्यान त्यांच्या हृदयाची धडधड आणि प्रेमाची कहाणी सुरू झाली. 2008 मध्ये नयनताराने अभिनेता-दिग्दर्शक प्रभूदेवाला डेट करायला सुरुवात केली.

नवऱ्याचा रंग बदललेला पाहून प्रभूच्या पत्नीने लग्नाच्या 2 वर्षानंतर म्हणजे 2010 साली प्रभूदेवाची पत्नी रामलता यांनी दोघेही लिव्ह-इनमध्ये राहत असल्याची याचिका कौटुंबिक न्यायालयात दाखल केली. यानंतर प्रभूदेवाची पत्नी रामलता हिने नयनतारासोबत लग्न केल्यास उपोषण करू, अशी धमकी दिली होती.

मात्र, पती-पत्नीचे नाते इतके बिघडले की, जुलै 2011 मध्ये त्याने पत्नीला घटस्फोट दिला आणि 2012 मध्ये नयनतारा आणि प्रभूदेवासोबतचे सर्व संबंध संपवले. नयनतारामुळे पत्नीला घटस्फोट देऊन प्रभुदेवा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला होता.

पत्नीला 10 लाख रुपये पोटगी देण्यासोबतच त्याला 20-25 कोटी रुपयांची मालमत्ताही द्यायची होती. यासोबतच त्याने पत्नीला दोन कार आणि इतर मालमत्ताही दिली. त्यानंतर त्याचं आयुष्य बिकट झालं. पुढे काही दिवसांनी प्रभूदेवा आणि नयनताराचा घटस्फोट झाला.

त्यानंतर त्याला आर्थिक चणचण सोबतच, मानसिक त्रास देखील प्रचंड होऊ लागला.  या तणावामुळं त्याची परिस्थिती पाहून अनेकांनाच धक्का बसला होता. आज पन्नाशी ओलांडत असताना तो एकटा आहे. पुढे त्याच्या प्रेमकहाणीचं कोणतंही पान उलटलं गेलं नाही. हे सगळं असताना सुद्धा आज त्याच्या लोकप्रियतेत मात्र तसुभरही कमतरता झाली नाही.

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now