Share

Aftab : श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये असताना, ‘या’ डेटिंग ऍपच्या माध्यमातून अफताब शोधत होता नवी शिकार

aftab shraddha

aftab use dating app  | मुंबईत झालेल्या श्रद्धा हत्याकांडाने फक्त राज्यातच नाही, तर देशभरात खळबळ उडवून दिली आहे. प्रियकर अफताबने श्रद्धा वालकर नावाच्या आपल्या प्रेयसीचा जीव घेतला आहे. त्याने ज्यापद्धतीने जीव घेतला आहे ते ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. ते दोघेही २०१८ पासून रिलेशनशिपमध्ये होते.

अफताबने श्रद्धाचे तुकडे करुन घरातील फ्रिजमध्ये ठेवले होते. इतकंच नाही, तर घरात मृतदेह असताना तो एका डेटिंग ऍपच्या माध्यमातून प्रेमसंबंधांसाठी तरुणी शोधत होता. मौजमजा करण्यासाठी कोणती नवीन तरुणी मिळते का? हेही तो शोधत होता. Bumble या डेटिंग ऍपवरुन तो मुलगी शोधत होता.

Bumble हे एक डेटिंग ऍप आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्यक्ती निवडत असतात. तुम्हाला त्यामध्ये फोटो दाखवला जातो. तुम्ही डावीकडे स्वाईप केले तर त्याला नकार कळवला जातो आणि जर तुम्ही उजवीकडे स्वाईप केले तर होकार कळवला जातो.

अनेक डेटिंग ऍप सध्या बाजारात उपलब्ध आहे. Match, Eharmony, Hinge, OKcupid, AdultFriendFinder, Tinder असे अनेक ऍप आज बाजारात आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्ही जोडीदार शोधू शकतात. पण अशा ऍपवरुन जोडीदार शोधताना सावध राहण्याची गरज आहे. या ऍपच्या माध्यमातून अनेक धक्कादायक घटना घडल्याचेही समोर आले आहे.

डेटिंग ऍपवर कोणताही जोडीदार शोधण्यापूर्वी काही काळजी घेणे गरजेचे आहे. २०२० नंतर, सर्वकाही खूप वेगाने बदलले. कोविडमुळे अनेक कामे ऑनलाइनही होऊ लागली. लॉकडाऊन दरम्यान डेटिंग ऍप्सचा वापरही खूप वाढल्याचे अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.

आभासी दुनियेच्या माध्यमातून लोक आपल्या जोडीदाराचा शोध घेऊ लागले. अशात ऑनलाइन डेटिंग ऍप्सचे काही धोके देखील आहेत. यामुळे ऑनलाइन डेटिंग करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जर तुम्ही डेटिंग ऍप वापराताना काळजी घेतली नाही. ते तर खुप धोकादायक ठरु शकते.

महत्वाच्या बातम्या-
Mumbai : प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे ३५ तुकडे करून फ्रिजमध्ये भरून ठेवले; हत्येचं प्लॅनिंग पाहून पोलीसही हादरले
मुंबईने संघातून काढताच पोलार्डने घेतली निवृत्ती; म्हणाला, काहीही झालं तरी मुंबईविरूद्ध खेळू शकत नाही
Mahesh babu : सुपरस्टार महेश बाबूवर कोसळला दुखा:चा डोंगर; आई पाठोपाठ वडीलांचेही निधन

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now