पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरिया (Danish Kaneria) पाकिस्तानी संघातील धार्मिक भेदभावावर अनेकदा प्रश्न उपस्थित करत आहे. दानिशने आता माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर (Shahid Afridi) धार्मिक भेदभावाचा आरोप केला आहे. कनेरियाने एका वृत्तसंस्थेशी बोलताना आफ्रिदी हा खोटारडा असल्याचा आरोप केला. कनेरियाने आरोप केला आहे की, शाहिद आफ्रिदी त्यांच्याशी वाईट वागायचा कारण तो हिंदू असूनही पाकिस्तानी क्रिकेट संघात खेळत आहे.(Afridi is a liar and has no character)
याआधी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनेही कनेरियाला सपोर्ट करत पाकिस्तानी संघातील काही क्रिकेटपटूंवर धर्माच्या आधारावर भेदभाव केल्याचा दावा केला होता. कनेरिया म्हणाला, शोएब अख्तर हा पहिला व्यक्ती होता ज्याने माझ्या समस्येबद्दल उघडपणे बोलले. हिंदू असल्यामुळे मला संघात वाईट वागणूक मिळाली, असे शोएबने स्पष्ट सांगितल्यामुळे मी त्यांना सलाम करतो. मात्र, त्यानंतर अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दबाव आणला आणि त्यानंतर त्यांनी याबाबत बोलणेच बंद केले. पण, हे माझ्या बाबतीत घडले हे खरे आहे.
शाहिद आफ्रिदी मला नेहमीच त्रास देत असे. आम्ही एकाच विभागात खेळायचो. तो मला बेंचवर बसवून ठेवायचा आणि एकदिवसीय स्पर्धेत खेळण्याची संधी देत नव्हता. कनेरिया म्हणाला, मी संघात असावे, असे त्याला वाटत नव्हते. तो लबाड, फसवा होता… कारण तो चारित्र्यहीन माणूस आहे. मात्र, माझे लक्ष फक्त क्रिकेट खेळण्यावर होते आणि मी या सर्व चालींकडे लक्ष दिले नाही.
शाहिद आफ्रिदी हा एकमेव व्यक्ती होता जो इतर खेळाडूंकडे जाऊन त्यांना माझ्याविरुद्ध भडकावायचा. मी चांगले खेळत होतो आणि तो माझ्यावर जळत होता. मी पाकिस्तानसाठी खेळलो याचा मला अभिमान आहे आणि यासाठी मी आभारी आहे. स्पॉट फिक्सिंगच्या आरोपानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कनेरियाला निलंबित केले होते. तो म्हणाला की जर आफ्रिदी तिथे नसता तर त्याने पाकिस्तानसाठी आणखी अनेक एकदिवसीय सामने खेळले असते. आजही कनेरिया आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप खोटे असल्याचे सांगतात.
41 वर्षीय क्रिकेटर म्हणाला, माझ्यावर काही खोटे आरोप करण्यात आले. माझे नाव या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्तीशी जोडले गेले आहे. तो इतर पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा आणि शाहिद आफ्रिदीचाही मित्र होता. पण मला का टार्गेट करण्यात आले हे मला माहीत नाही. मी पीसीबीला ही बंदी उठवण्याची विनंती करू इच्छितो जेणेकरून मी माझे काम करू शकेन. असे अनेक फिक्सर्स आहेत ज्यांच्यावरील बंदी उठवण्यात आली आहे.
कनेरिया पुढे म्हणाला, मला कळत नाही की मला तशीच वागणूक का दिली जात नाही. मी माझ्या देशासाठी खेळलो आहे आणि मला इतर खेळाडूंप्रमाणेच संधी मिळायला हवी होती. आता मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही. मी पीसीबीकडून कोणतेही काम मागत नाही, त्यामुळे कृपया ही बंदी उठवा जेणेकरून मी शांततेत राहू शकेन आणि माझे काम सन्मानाने करू शकेन.
महत्वाच्या बातम्या-
असदुद्दीन ओवेसी माझे जुने मित्र, ते क्षत्रिय आहेत आणि रामाचे वंशज आहेत; भाजप खासदाराचा अजब दावा
बिनबुडाचे आरोप करुन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पीएसएलची बदनाम करु नको; आफ्रिदी फॉकनरवर संतापला
बॅट घेऊन या खेळाडूचे डोकं फोडायला निघाला होता शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदीनेही दिला होता पाठिंबा
मी शाहिद आफ्रिदीसोबत शारीरिक संबंध ठेवायला तयार आहे; अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ