mohammad nabi : टी २० वर्ल्डकप सुरु असतानाच ‘या’ संघाच्या कर्णधाराने सोडले कर्णधारपद; म्हणाला, आमचा…

afganistan mohammad nabi leave captaincy  | टी-२० वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानची कामगिरी विशेष राहिली नाही आणि उपांत्य फेरीतही ते स्थान मिळवू शकले नाहीत. शुक्रवारी झालेल्या अखेरच्या सामन्यात अफगाणिस्तान संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. हैराण करणारी गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानला टी २० वर्ल्डकपमध्ये एकही सामना जिंकता आलेला नाही.

टी २० वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर अफगाणिस्तानच्या संघाचा कर्णधार मोहम्मद नबीने मोठा निर्णय घेतला आहे. या पराभवानंतर मोहम्मद नबीने टी २० संघाचे कर्णधारपद सोडले आहे. मोहम्मद नबीने ट्विटर हँडलवरुन एक ट्विट करत आपण कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर केले आहे.

मोहम्मद नबीने लिहिले की, आमचा टी २० वर्ल्डकपचा प्रवास संपला आहे. निकाल चाहत्यांच्या आणि आमच्या अपेक्षेप्रमाणे लागला नाही. सामन्यांमधील निकालांमुळे आम्ही खूप निराश झालो आहोत. गेल्या एक वर्षापासून आमच्या संघाला मोठ्या स्पर्धेप्रमाणे तयारीही करता आली नव्हती.

नबीने पुढे लिहिले की, गेल्या काही दौऱ्यांमध्ये संघ व्यवस्थापन, निवडकर्ते आणि मी एकाच विचाराने पुढे जात नव्हतो ज्याचा परिणाम संघावर झाला. म्हणूनच मी कर्णधारपदाचा राजीनामा देत आहे. मी माझ्या देशासाठी खेळत राहीन. मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छितो. चाहत्यांनी दिलेले प्रेम मी कधीच विसरु शकणार नाही, धन्यवाद.

३७ वर्षीय मोहम्मद नबीने राशिद खानच्या राजीनाम्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या टी २० विश्वचषकापूर्वी कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली होती. याआधी २०१० मध्ये नवरोज मंगलच्या जागी नबीला कर्णधार बनवण्यात आले होते. नबीने त्याच्या दुसऱ्या कार्यकाळात एकूण २३ टी-२० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले.

२३ सामन्यांपैकी नबीने १० सामने जिंकले आणि १३ सामने गमावले आहे. अफगाणिस्तानने नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेतील गट सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु त्यानंतर सुपर-फोर टप्प्यातील तीनही सामने गमावले होते. त्यामुळे त्यांना आशिया कपमधून बाहेर पडावे लागले होते.

सध्याच्या टी २० विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर अफगाणिस्तानने एकूण पाच सामने खेळले ज्यात त्यांना तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. पावसामुळे हे दोन्ही सामने रद्द झाले होते. त्यामुळे अफगाणिस्ताच्या संघाचे संपुर्ण समीकरणच बिघडलेले दिसते.

महत्वाच्या बातम्या-
Liton Das : भगवान कृष्णाचा कट्टर भक्त आहे ‘हा’ बांगलादेशी खेळाडू, भारताविरुद्ध केली होती धडाकेबाज फलंदाजी
अबब..! भाईंदरच्या मच्छीमारांच्या गळाला लागला ‘वाघ्या पाकट’ मासा; फोटो पाहून व्हाल थक्क
Taxi: ..अन् चालत्या टॅक्सीतच महिलेने दिला बाळाला जन्म, जॅकेटमध्ये बाळाला गुंडाळून पोहोचली हॉस्पिटलमध्ये