Share

AFG Vs AUS : बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नवख्या अफगाणिस्तानने रडवले, राशीदने एकट्याच्या बळावर…

rashid khan

afg vs aus rashid khan shocking batting  | ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी २० वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी प्रत्येक संघ धडपड करताना दिसून येत आहे. गुरुवारपर्यंत कोणताही संघ सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी निश्चित झालेला नव्हता. पण शुक्रवारी न्युझिलंडविरुद्ध आयर्लंडच्या सामन्यात न्युझीलंडने सामना जिंकला आणि सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.

आज ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी २० विश्वचषक २०२२ चा ३८ वा सामना झाला. हा सामना अॅडलेडमध्ये खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४ धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांची सेमी फायनलमध्ये जाण्याची शक्यता वाढली आहे.

ऑस्ट्रेलियासारखा बलाढ्य संघ अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात सहज जिंकेल असे वाटत होते. पण तसे झाले नाही. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा हा सामना खुपच थरारक झाला आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने २० षटकांत ८ गडी गमावून १६८ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून ग्रीन आपल्या संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकले नाहीत.

वॉर्नर २५ धावांवर तर ग्रीन हा फक्त ३ धावांवर बाद झाला. दोघेही पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर मिचेल मार्शने ऑस्ट्रेलियाच्या डावाची धुरा सांभाळली. त्याने ३० चेंडूत २ षटकार ३ चौकारांच्या मदतीने ४५ धावा केल्या. मात्र त्याला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही.

त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने शानदार खेळी खेळली आणि अर्धशतक झळकावून नाबाद राहिला. त्याने ३२ चेंडूत ६ चौकार २ षटकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या. मॅक्सवेलशिवाय मार्क्स स्टॉइनिसने २५ धावांचे योगदान दिले. अफगाणिस्तानकडून नवीन-उल-हकने ३ बळी घेतले.

तसेच त्याच्याशिवाय फारुकीने २ तर मुजीब आणि राशिद खानने १-१ बळी घेतला. अफगाणिस्तानचा संघ १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजने संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र तो १७ चेंडूत २ षटकार २ चौकारांच्या मदतीने २६ धावा करून बाद झाला.

यानंतर इब्राहिम झद्रान आणि गुलबदिन नायब यांनी चांगली कामगिरी केली, पण हे दोन्ही खेळाडूही फार काळ टिकून राहू शकले नाही आणि लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतले. झाद्रानने ३३ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने २६ धावा केल्या, तर नायबने २३ चेंडूत दोन षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने ३० धावा केल्या.

आफगाणिस्तानच्या हातातून सामना जातोय हे दिसत होते. पण मैदानावर राशीद खानचे तुफान आले. राशीद खानने २३ चेंडूत ४८ धावा केल्या. त्याने त्याच्या कामगिरीत ४ षटाकार आणि ३ चौकार मारले. त्याची कामगिरी पाहून ऑस्ट्रेलियाची धाकधुक वाढली होती. पण शेवटच्या दोन चेंडूत सामना पलटला आणि राशीद खानची कामगिरी फेल गेली. हा सामना जरी ऑस्ट्रेलियाने जिंकला असला तरी अफगाणिस्तानने त्यांना चांगली टक्कर दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-
Eknath Shinde : उद्धवसाहेबांना भाजपशी युती करुन घ्या, असं सांगितलं होतं पण ते म्हणाले…; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा
Arshdeep Singh : अर्शदीपने खुलं केलं वर्ल्डकपमधील यशामागचं रहस्य; महाराष्ट्राच्या ‘या’ सुपुत्राला दिले क्रेडीट
ncp : पवार रुग्णालयात ॲडमीट असतानाच राष्ट्रवादीत खळबळ; दोन जवळच्या व्यक्तींनी सोडली साथ

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now