आपल्या कारकिर्दीत अनेक आगळेवेगळे चित्रपट देणाऱ्या या बॉलिवूड दिग्दर्शकाचा 7 एप्रिलला वाढदिवस असतो. आम्ही बोलत आहोत ‘सत्या’, ‘रंगीला’, ‘सरकार’ आणि ‘कंपनी’ सारखे चित्रपट बनवणाऱ्या राम गोपाल वर्माबद्दल. मात्र आजकाल ते काहीतरी वेगळं करू लागले आहे. राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांची केवळ कारकीर्दच नाही, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही (Ram Gopal Varma Personal Life) अनेक चढ-उतार आले आहेत.(Affairs of Ram Gopal Varma)
इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींसोबत राम गोपाल वर्मा यांचे नाव जोडले गेले. त्यांच्या आणि उर्मिला मातोंडकर (Ram Gopal Varma Urmila MatondkarAffair) च्या अफेअरची सर्वाधिक चर्चा आहे. असे म्हणतात की राम गोपालमुळेच उर्मिलाला प्रसिद्धी मिळाली आणि जेव्हा अंतर आले तेव्हा उर्मिलाचे करिअर त्यांच्यामुळेच उद्ध्वस्त झाले.
राम गोपाल वर्मा यांची कहाणी पहिल्यापासून जाणून घेऊया. त्यांचा जन्म हैदराबाद येथे झाला. त्यांनी सिविल इंजीनियरिंगचे शिक्षण घेतले. एकदा आपल्या वागण्याबद्दल बोलताना त्यांनी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना पुस्तके वाचण्यापेक्षा लोकांना वाचणे आवडते. ते वर्ग सोडून चित्रपट बघायला जायचे. असे करत असतानाच ते चित्रपटांच्या प्रेमात पडले आणि दिग्दर्शनात हात आजमावून पाहावा असे त्यांना वाटले.
राम गोपालने ‘शिवा’ या तेलुगु चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ते बॉलिवूडकडे वळले. येथे त्यांनी त्यांचा पहिला हिंदी चित्रपट ‘रंगीला’ बनवला. पहिल्याच चित्रपटात त्यांनी षटकार ठोकला आणि ते हिट दिग्दर्शकांच्या यादीत येऊन बसले. रंगीलामध्ये आमिर खान आणि उर्मिला मातोंडकर दिसले होते. त्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी 1998 मध्ये ‘सत्या’ चित्रपटातून पुन्हा एकदा धुमाकूळ घातला. हा चित्रपट चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक ठरला.
उर्मिला मातोंडकर आणि राम गोपाल वर्मा यांच्या अफेअरच्या चर्चा त्या काळात रंगल्या होत्या. असे म्हटले जाते की दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते, पण त्यावेळी राम गोपाल वर्माचे लग्न झाले होते. ही मसालेदार बातमी राम गोपाल वर्मा यांची पत्नी रत्ना यांच्या कानावर पडताच वाद आणखी वाढला. रत्ना इतकी चिडली होती की तिने अभिनेत्रीच्या कानाखाली मारली होती.
राम गोपाल वर्मा यांनी उर्मिला मातोंडकरसोबत जवळपास 13 चित्रपटांमध्ये काम केले. असे म्हटले जाते की त्यांनीच अभिनेत्रीचे करिअर चमकवले. असे म्हणतात की राम गोपाल वर्माचे इतर दिग्दर्शकांसोबतचे संबंध चांगले नव्हते आणि उर्मिलाचाही आग्रह होता की तिला फक्त रामूसोबतच चित्रपट करायचे होते. तिच्या या जिद्दीमुळे इतर दिग्दर्शकांनीही उर्मिलापासून अंतर ठेवले.
महत्वाच्या बातम्या-
..त्यामुळे राम गोपाल वर्मांचा संसार झाला उद्ध्वस्त, पत्नीने या टॉपच्या अभिनेत्रीला केली होती मारहाण
राम गोपाल वर्मांचे धक्कादायक वक्तव्य; घटस्फोटाचा आनंद साजरा केला पाहिजे, कारण ..
धनुष-ऐश्वर्याच्या घटस्फोटानंतर राम गोपाल वर्मा म्हणाले, लग्न म्हणजे पूर्वजांनी लादलेली वाईट प्रथा
‘द काश्मीर फाइल्स’ने बॉलिवूडचा नाश केला; चित्रपट बघितल्यानंतर राम गोपाल वर्मांनी दिली पहिली प्रतिक्रिया