Share

लाइव्ह सामन्यात भारतीय खेळाडूंना मारहाण, अफगाणिस्तानकडून गैरवर्तन; व्हिडिओ व्हायरल

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे शनिवारी झालेल्या आशियाई चषक २०२३ फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा(Afganistan) पराभव केला आहे. भारताने २-१ अशा फरकाने हा सामना जिंकला. या सामन्यात भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री आणि सहल अब्दुल समद यांनी शानदार कामगिरी करत दोन गोल केले. (Afaganistan players beating Indian players in a live match)

कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यानंतर अफगाणिस्तानच्या संघातील खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना मारहाण केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अफगाणिस्तान खेळाडूंच्या या वर्तनावर अनेक खेळाडूंनी टीका केली आहे.

या सामन्यात भारतीय संघाने अखेरच्या क्षणी गोल नोंदवत अफगाणिस्तानवर विजय मिळवला. भारताचा हा विजय अफगाणिस्तानच्या खेळाडूंना पचवता आला नाही. भारताच्या विजयामुळे अफगाणिस्तानचे खेळाडू आक्रमक झाले आणि त्यांनी भारतीय खेळाडूंसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. यावेळी भारतीय खेळाडूंनी त्यांचा विरोध केला.

यानंतर हे प्रकरण खूप वाढले आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना मारहाण केली. या व्हिडिओमध्ये अफगाणिस्तानच्या आणि भारतीय खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली असल्याचे दिसत आहे. तसेच अफगाणिस्तानचे तीन खेळाडू आणि दोन भारतीय खेळाडू यांच्यामध्ये सुरवातीला वाद होतो.

त्यानंतर भारतीय खेळाडू गुरप्रीत सिंग यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली. त्यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका अफगाणिस्तानच्या खेळाडूने त्यांना मारहाण केली. त्यानंतर भर्तरीय खेळाडू त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी अफगाणिस्तानच्या खेळाडूला विरोध केला. त्यानंतर अफगाणिस्तानचे खेळाडू देखील मैदानात आले.

यावेळी दोन्ही संघांमध्ये जोरात वाद झाल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक युजर्सनी सोशल मीडियावर अफगाणिस्तान खेळाडूंच्या कृतीचा निषेध केला आहे. अनेकांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. भारताने आशियाई चषक २०२३ फुटबॉल स्पर्धेच्या तीनही पात्रता सामन्यात विजय मिळवला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
४ वर्षांच्या चिमुकल्याला आला हार्टॲटॅक! ‘ही’ लक्षणे असल्यास लहान मुलांनाही येतो हार्टॲटॅक
शरद पवारांनी दटावताच संजय राऊतांची पलटी; ज्या आमदाराला गद्दार म्हटले त्याचेच केले कौतूक
गौतम गंभीरकडून नुपुर शर्माचे जाहीर समर्थन; धर्मनिरपेक्ष आणि उदारमतवाद्यांवर साधला निशाणा

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now