‘सरकार पडूदे नाहीतर तुम्हाला मारून टाकू’; शिवसेनेच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार गेल्याने महाविकास आघाडी धोक्यात आली आहे. त्यामुळे सत्ताधारी नेते आपले सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. (advocate threating letter to kishori pednekar)

अशात किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अत्यंत अश्लील भाषेतील पत्र किशोरी पेडणेकर यांना पाठवण्यात आले आहे. या पत्रात अजित पवारांचाही उल्लेख करण्यात आला आहे. पेडणेकरांना आलेल्या धमकीच्या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अश्लील भाषेत पत्र लिहून किशोरी पेडणेकरांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हे पत्र उरणमधील विजेंद्र म्हात्रे नावाच्या वकिलाने पाठवले आहे. या पत्रात किशोरी पेडणेकर यांना अश्लील भाषेत शिवीगाळही करण्यात आली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.

अजित पवारांच्या सांगण्यावरुनच हे सरकार पाडले जात आहे, असा आरोप विजेंद्र म्हात्रे या वकिलाने केला आहे. सरकार पडू दे, नाहीतर तुला जीवे मारू, अशा शब्दांत किशोरी पेडणेकर यांना धमकी देण्यात आली आहे. आता याची आपण गांभीर्याने दखल घेतल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात जसं काय मुघलाई आहे, अशा पद्धतीने हे पत्र आलं आहे. अशा पत्रांना मी घाबरत नाही. ना. म. जोशी पोलिस स्टेशनला कळवलंय. मला जे गार्ड दिलेत. ते स्वत: हे पत्र घेऊन गेलेत. पोलिस याच्यावर लवकरच कारवाई करतील, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, याआधीही किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र आलेले आहे. वरळी सिलेंडर स्फोट प्रकरणावरुन भाजप नेते आशिष शेलार आणि किशोरी पेडणेकर यांच्यात वाद पेटला होता. त्यावेळीही त्यांना एक जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले होते. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

महत्वाच्या बातम्या-
राणादासाठी पाठकबाईंनी घेतला खास उखाणा; म्हणाली, फुलावर फिरत असतो भुंगा…
VIDEO: बहिणीच्या लग्नादिवशी भावाने दिली अशी भेट, उपस्थित सगळ्यांचेच डोळे पाणावले
सध्याची परिस्थिती पाहता शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिला ‘हा’ मोलाचा सल्ला; पवार टाकणार ‘असा’ डाव