मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण केलं. परंतु राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषण मागे घेतले. तीन दिवसांनंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि सांस्कृतीक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेऊन मागण्या पुर्ण केल्याची लेखी ग्वाही दिली. याचाच धागा पकडत संभाजीराजेंचं आंदोलन हे स्क्रीन आंदोलन असल्याची टीका अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. आझाद मैदानात व्हॅनिटी कार कशासाठी? असा सवाल अॅड. सदावर्ते यांनी उपस्थित केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “खासदार संभाजीराजेंच्या खासदारकीचा कार्यकाळ जून महिन्यात संपतोय. त्यामुळे संभाजीराजे व्हॅनिटी कार घेऊन आझाद मैदानात बसले,” असं अॅड. सदावर्ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आझाद मैदानावर स्क्रीन आंदोलन सुरू होतं. स्क्रीनमध्ये दिसणाऱ्या टाईपचं आंदोलन उभा करायचं, मग मराठ्यांचे सगळे मंत्री पिच्चरटाईप भेटायला जातात. कधी न दिले जाऊ शकतात, अशा प्रकारचे आश्वासन दिले जातात, असा सदावर्तेंनी यांनी लगावला.
दरम्यान, दिल्लीची सत्तापलट करणाऱ्या आंदोनलातसुद्ध कधी अशा लक्झरी पाहिल्या नाहीत. केजरीवालांनी दिल्लीत सत्तापालट केलं, त्या आंदोलनातही व्हॅनिटी कार नव्हती, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतही कधी व्हॅनिटी कार मी पाहिल्या नाहीत, असे म्हणत सदावर्तेंनी संभाजीराजेंच्या उपोषणावर टीका केली.
जाणून घ्या कोण आहेत.. अॅड. गुणरत्न सदावर्ते हे मूळचे नांदेडचे आहेत. त्यांनी त्यांचं शिक्षण ओरंगाबाद आणि मुंबईतून झालं आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात दिलेला कायदेशीर लढा असो की सध्या सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात त्यांनी घेतलेली उडी असो. सदावर्ते यांनी अशा अनेक केसेस न्यायालयात लढल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
‘रात्री हे लोक माझे व्हिडीओ पाहतात आणि सकाळी मलाच ट्रोल करतात’, ट्रोलर्सवर संतापली अभिनेत्री
VIDEO: ‘व्वा! काय आयडिया आहे, आपण देखील असा विचार करायला हवा’, आनंद महिंद्रांचा नितीन गडकरींना सल्ला
‘भारत माता की जय’ म्हणताच आलेला जोश मोदीजी जिंदाबाद म्हणताच उतरला, व्हिडीओ व्हायरल
काकाच्या मुलीवर प्रेम करणे पडले महागात, काकाने ‘असा’ काढला पुतण्याचा काटा, वाचून धक्का बसेल