राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते हे चांगलेच अडचणीत आले आहे. वेगवेगळ्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे.
अशातच अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोल्हापूर न्यायालयाने सदावर्ते यांना काहिसा दिलासा देत पोलिसांची पोलीस कोठडीची मागणी अमान्य करत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. हा दिलासा मिळाल्यानंतर सदावर्ते यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा समाज व मागासगर्वीय समाज यांच्यात जातीय तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी अटक केली आहे. सदावर्ते यांच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपली. आज, त्यांना कसबा बावडा येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
त्याची मुदत संपल्यावर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने सदावर्तेंना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोल्हापूर न्यायालयाकडून थोडासा दिलासा मिळाल्यानंतर सदवर्ते यांनी माध्यमांशी बोलताना एक मोठं विधान केलं आहे.
‘आपण राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर यांच्या विचाराचे वंशज असल्याचा दावा सदवर्ते यांनी केला आहे. तसेच चौथा स्तंभ पाठीशी असल्यामुळे माझा खून होत नाही, असंही सदावर्ते म्हणाले. दरम्यान, अजूनही सदवर्ते यांच्या अडचणींमद्धे वाढ होणार असल्याच बोललं जातं आहे.
दरम्यान, आता सदावर्ते पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत. यावरून जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे का, असे पत्रकारांनी विचारले. यावर उत्तर देताना सदावर्ते यांनी संविधानाची शक्ती त्रास बाजूला ठेवते असे म्हंटले आहे. तसेच मराठा समाज व मागासवर्गीय समाज यांच्या जातीय तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर विधान केल्याप्रकरणी सदावर्ते यांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
गणेश नाईकांना करणी सेनेचा खंबीर पाठिंबा; ‘लिव इन रिलेशनशिपमध्ये बलात्कार नसतो’
शिवसेनेच्या पुढाऱ्यांनी मंगेशकर कुटुंबियांना मदत केली पण…’ छगन भुजबळांनी करून दिली आठवण
अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या, सदाभाऊ खोत यांची जहरी टीका
आलिया भट्ट-रणबीर कपूरचा २००४ मधील ‘तो’ फोटो व्हायरल, ११ वर्षांच्या वयातच दोघांना झाले होते प्रेम