Aditya Thackeray: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठा भूकंप झाला. त्यातुन शिवसेना पक्ष सावरण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेना युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी तर राज्यात ठिकठिकाणी झंझावाती सभा घ्यायला सुरुवात केली. त्या दरम्यान शिवसेनेच्या निष्ठावान शिवसैनिकांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणाऱ्या आदित्य ठाकरे यांना एक अचंबित करणारा अनुभव यादरम्यान आला.
आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांची एक सभा झाली. त्याप्रसंगी शिवसेनेचे कोकणातील आमदार राजन साळवी तसेच आदेश बांदेकर आदित्य ठाकरेंसोबत होते. आश्चर्याची बाब म्हणजे आदित्य ठाकरेंची सभा ज्या चौकात होती. त्या ठिकाणाहून जवळच भाजप कार्यालय होते. त्यामुळे कार्यालयाजवळून जाताना शिवसैनिक मोठी घोषणाबाजी करत होते.
या सभेवेळी घडलेल्या एका प्रसंगाने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. आदित्य ठाकरेंची सभा चालू असताना भाजप कार्यकर्ते आदित्य ठाकरेंचे फोटो काढताना दिसले. आदित्य ठाकरेंनी पण त्यांच्या दिशेने स्मितहास्य करत पाहिले. या सर्व प्रकारामुळे आदित्य ठाकरेंची फॅन फॉलोइंग सगळ्या पक्षांत असल्याचे दिसते आहे.
आदित्य ठाकरेंच्या या सभेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडीओची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. आदित्य ठाकरे राज्यभर फिरून शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. मात्र मागील काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे आजारी पडल्याने त्यांच्या शिवसंवाद यात्रेला काहीसा ब्रेक लागला होता.
मात्र आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे. कोकणच्या दौऱ्यावर असताना घडलेल्या या प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आदित्य ठाकरे आपल्या सभांमधून कायम पक्षाशी बंडखोरी करणाऱ्या आमदारांवर जबरदस्त शाब्दिक हल्ला चढवत असतात.
महत्वाच्या बातम्या-
Vinod Kambli : विनोद कांबळीवर आलेत हलाखीचे दिवस; म्हणाला, सचिनला सगळं माहित आहे पण माझी..
सांगली जिल्हा हादरला! शासकीय कंत्राटदाराचे अपहरण; वाचा सविस्तर चित्रपटालाही लाजवेल असा घटनाक्रम
दिशा वकानीनं ‘या’ व्यक्तीमुळे सोडला ‘तारक मेहता शो’; वाचा काय आहे नेमकं कारण