राज्यात शिंदेशाही पर्वास सुरुवात झाली आहे. राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या धक्क्यातून अद्यापही शिवसेना सावरताना दिसत नाही. शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे अख्खं ठाकरे सरकार कोसळलं.
याचबरोबर सत्तेत असून देखील अनेक जवळच्या व्यक्तींनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. शिवसेनेला लागलेली गळती थांबविण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे जोमाने कामाला लागले आहेत. शिवसेनेतील बंडाळीनंतर आदित्य ठाकरे यांनी राज्यभर शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे.
आदित्य ठाकरे राज्यातील प्रत्येक भागात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. पुन्हा पक्षाला नव्याने उभारी देण्याच काम आता ठाकरे पिता – पुत्र करत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात तरुणांचा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे विरोधकांची डोकेदुखी वाढताना पाहायला मिळत आहे.
राज्यातील पप्रत्येक भागात जाणून आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांचा विश्वास जिंकत आहेत. विशेष बाब म्हणजे, तरुण वर्गाचा आदित्य ठाकरे यांना मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे राज्यभरातील वेगवेगळ्या भागातील शिवसैनिक मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरेंशी मुंबई आणि एमएमआर भागातील शिवसैनिक संवाद साधत आहेत. आदित्य ठाकरे हे राज्यातील प्रत्येक भागात जाऊन विरोधकांना लक्ष करताना पाहायला मिळत आहे. बंडखोरी केलेल्यांना आदित्य ठाकरे हे गद्दार म्हणतं आहेत. यामुळे राजकारण देखील तापलेलं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, बंड केल्यापासून एकनाथ शिंदे गट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा मांडत आहेत. उद्धव ठाकरेंबद्दल मतदारांमध्ये असलेली सहानुभूती दूर करण्यासाठी देखील भाजपकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. यामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Pune : बायकोला अश्लील मेसेज करणाऱ्या चुलत मेहुण्याचा खून; धक्कादायक घटनेने पुणे हादरले
Uddhav Thackeray : …त्यामुळे ‘मातोश्रीवर बसून शेळ्या कसल्या हाकता? शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सभागृहात आक्रमक भूमिका घ्या
Crime News: बायकोला सर्वांसमोर कपडे काढायला लावले अन्…; नवऱ्याचे पुत्रप्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यानुसार अघोरी कृत्य
आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यामुळे बंडखोरांची डोकेदुखी वाढली; ठाकरेंसाठीची गर्दी पाहून शिंदे गट अस्वस्थ