Aditya thackeray | एकीकडे राज्यात शिवसेना कोणाची असा प्रश्न सर्वांना पडला आहे. हा वाद आता न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे. तर दुसरीकडे बंडखोर आमदारांना कसा धडा शिकवायचा याकडे उद्धव ठाकरेंचे लक्ष आहे. आदित्य ठाकरेही त्यासाठी मैदानात उतरले आहेत.
शिवसेनेशी बंडखोरी केलेल्या आमदारांना धडा शिकवण्याच्या तयारीला शिवसेना लागली असून दौऱ्यावर दौरे सुरू आहेत. बंडखोर आमदार व खासदारांना त्यांच्याच मतदारसंघात मात देण्याचे नियोजन सध्या सुरु आहे. त्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे दौरा करत आहेत.
आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी मुबंईत वेगवेगळ्या ठिकाणी निष्ठा यात्रा काढली. आदित्य ठाकरे बंडखोर आमदार दिलीप लांडे यांच्या मतदारसंघाचा दौरा करत होते. यावेळी चांदिवली परिसरात मंचावर आदित्य ठाकरे यांचे भाषण सुरु असताना अजाण सुरु झाली.
तेव्हा ‘मला वाटतं दोन मिनिटं थांबूया’ असे सांगत आदित्य ठाकरेंनी काही वेळ भाषण थांबवलं आणि नंतर परत सुरु केलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरे आजारी असताना हे गद्दार लोक आमदार- खासदार गोळा करत होते.
ही गोष्ट तुम्हाला पटते का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी सभेतील लोकांना विचारला. या गद्दारांना ज्यांनी ओळख दिली त्यांच्याच पाठीत यांनी खंजीर खुपसला, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. मागील काही सभांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली होती.
तेव्हा राज ठाकरेंनी वारंवार त्यांनी भोंगे बंद करा असे आवाहनही केले होते. याउलट आता आदित्य ठाकरे यांनी अजाण सुरु असताना मध्येच भाषण थांबवत त्याचा मान राखल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या घटनेची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या
राज्यपालांचं विधान राज्याचा अपमान करणार, केंद्र सरकारकडं आम्ही तक्रार करणार; शिंदे गट आक्रमक
‘या’ व्यक्तीने बनवली अनोखी सायकल, सुनील शेट्टीही झाला फॅन, म्हणाला, ‘ब्रिलियंट आयडिया’
Friendship: माहिती कामाची! जीवनात कधीच येणार नाही पैशांचा प्रॉब्लेम, फक्त ‘या’ ३ गोष्टींशी ठेवा घट्ट मैत्री
Ramdas Athawales: त्यांचं नाव अधीर पण डोकं झालंय बधीर, राष्ट्पतींना ‘राष्ट्रीय पत्नी’ म्हणणाऱ्या खासदाराला आठवलेंचा टोला