Aditya Thackeray: आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा दौरा पुन्हा सुरू झाला. जळगावमध्ये येऊन ठेपलेल्या शिवसंवाद यात्रेत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटात गेलेल्या शिवसेना आमदाराला आव्हान उभं केल्याचं दिसत आहे. जळगावमधल्या सभेत आदित्य ठाकरे यांनी मोठा डाव टाकला आहे.
जळगावमध्ये आदित्य ठाकरे यांनी आमदार किशोर पाटील यांच्या पाचोरा मतदारसंघात सभा घेतली. सभेदरम्यान आदित्य ठाकरे यांनी ‘वैशालीताईंसाठी पुन्हा पाचोर्यात यावं लागेल,’ असं म्हणताच शिवसैनिकांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.
किशोर पाटील हे पाचोरा मतदारसंघात कट्टर शिवसैनिक असणाऱ्या दिवंगत माजी आमदार आर ओ पाटील यांचा राजकीय वारसा चालवतात. वैशाली सूर्यवंशी या आर ओ पाटील यांच्या कन्या आहेत. वैशाली यांनी काही दिवसांपूर्वी आमदार किशोर पाटील यांनी शिंदे गटात जाण्याच्या भूमिकेला विरोध केला होता.
राजकारणात सक्रिय नसणाऱ्या वैशाली यांनी शिवसेना आणि मातोश्रीसोबतची निष्ठा वडिलांप्रमाणेच आपण कायम ठेवल्याचे सांगितले. आणि आपल्या भावाला विरोध केला. याच गोष्टीला नेमकं हेरत आदित्य ठाकरे यांनी थेट २०२४ साठी वैशाली यांनाच तिकीट देण्याचा संकेत दिला आहे.
आर ओ पाटील यांच्या आमदारकीचा व्याप वाढत गेला. त्यांनी सुरू केलेल्या निर्मल सीड्स उद्योग समूहाचाही व्याप मोठा होता.तो उद्योग समूह त्यांची मुलगी वैशाली सांभाळतात. त्यामुळे आपला पुतण्या किशोर पाटील यांना पोलीस खात्याची नोकरी सोडून त्यांनी आपल्या उद्योग समूहात पहिल्यांदा नोकरी दिली. त्यानंतर राजकारणात सहभागी होण्यास सांगितले.
आर ओ पाटील कट्टर शिवसैनिक होते. पाचोऱ्यात पहिला भगवा त्यांनीच फडकवला. शिवसेनेची ताकद त्यांच्यानंतर किशोर पाटील यांनी जिल्हा परिषद, दूध संघ, जिल्हा बँक अशा विविध स्तरांवर वाढवली. २०१४ आणि २०१९ ला सलग २ टर्म आमदार बनलेल्या किशोर पाटलांना मोठा धक्का मातोश्री कडून मिळणार असल्याचे दिसते. वैशाली सूर्यवंशी यांना मातोश्रीने २०२४ मध्ये किशोर पाटलांसमोर उभे केल्यावर घरातूनच मोठे आव्हान किशोर पाटलांच्या समोर असणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
Yogurt: शिंदे गट समर्थकाच्या दहीहंडीत दारुड्याचा राडा, दोरीवर चढून दहीहंडी फोडली अन्…
‘या’ गिअरमध्ये गाडी चालवल्यास होणार पाच हजारांचा दंड; मोदी सरकारचा मोठा निर्णय
‘नितीन गडकरी यांच्या विरोधातही CBI चा वापर होणार आहे’