सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. अशातच शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीचे मंत्री आदित्य ठाकरे प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येत दाखल झाले. यामुळे आता आणखीच आरोप – प्रत्यारोपांचे सत्र रंगले आहे. विरोधकांनी संधीच सोनं करत आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर सडकून टीका केली आहे.
आदित्य ठाकरे शिवसेना (Shivsena) नेत्यांसमवेत अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. ही राजकारणाची नव्हे तर रामराज्याची भूमी आहे, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले आहे. पुढे बोलताना आदित्य ठाकरेंनी एक मोठी घोषणा केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, ‘महाराष्ट्र राज्यातून अयोध्येमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची चांगली सोय व्हावी म्हणून राज्य सरकार इथे १०० खोल्यांचे सुसज्ज महाराष्ट्र सदन बांधणार असल्याची मोठी घोषणा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी यावेळी बोलताना केली.
या सदनासाठी उत्तर प्रदेश सरकारकडे जागेची मागणी करणार असल्याच देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. अयोध्येमध्ये महाराष्ट्र सदनसाठी जागा मागण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याच देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. सुमारे १०० खोल्यांचे हे भवन अयोध्येत बनवण्याचा आमचा विचार असल्याच आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
दरम्यान, मुंबई महापालिकेमध्ये रामराज्य येणार असल्याचा विश्वासही आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. आम्ही येथे दर्शनासाठी आलो आहोत. इथे आम्ही राजकारण करायला आलो नाही, आम्ही तिर्थयात्रेला आलो आहोत असं आदित्य ठाकरे म्हणाले. सध्या आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
“मी चौथ्यांदा अयोध्येत येत आहे. आम्ही पहिले मंदिर, मग सरकार अशी घोषणा केली होती. २०१८ मध्ये उद्धव ठाकरे यांच्यासमवेत पहिल्यांदा आलो होतो. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती की, पहले मंदिर फिर सरकार. त्यानंतर वर्षभरातच न्यायालयाचा निर्णय आला आणि मंदिराला चालना मिळाली, असं ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
पुण्याच्या ऋतुराजची ‘तुफान’ फटकेबाजी, मारले पाच चेंडूत पाच चौकार; पाहा व्हिडिओ
प्रसिद्ध अभिनेत्रीला १३-१४ वर्षांच्या मुलांनी दिल्या बलात्काराच्या धमक्या, धक्कादायक कारण आले समोर
सामान्य नागरीकाने केली माळशेज घाटातील लुटारू पोलिसांची पोलखोल, व्हिडीओ होतोय व्हायरल
काश्मिरी पंडितांचे खून अन् गाय तस्करीवेळचं माॅब लिंचिंग यात काहीही फरक नाही; साई पल्लवीचे बेधडक वक्तव्य






