Aditya Thackeray: आपल्या शांत, संयमी स्वभावासाठी ओळखले जाणारे शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांचा रुद्रवतार आज सभागृहात पाहायला मिळाला. आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा वाद जुंपला. कुपोषणाबाबतच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी जे उत्तर दिले. त्यावर बोलताना आदित्य ठाकरेंनी लाज वाटली पाहिजे, असे शब्द उच्चारताच मुनगंटीवार यांचा पारा चढला.
मुनगंटीवार यांनी त्यावर तीव्र आक्षेप नोंदवला. व ते वडीलधारे आहेत, जेष्ठ आहेत, आपण वडिलांना असं बोलतो का?, असं आदित्य ठाकरेंना ते म्हणाले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांची बाजू घेत सभागृहात राष्ट्रवादीचे जयंत पाटील पुढे सरसावले. आणि आदित्यने परिस्थितीबाबत हे भाष्य केलं. कोणत्या मंत्र्याविषयी ते बोलले नाहीत, असं जयंत पाटील म्हणाले.
घडलं असं की, अधिवेशनाच्या बुधवारी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी कुपोषणामुळे शून्य मृत्यू झाल्याचे विधान केले. त्यावर अजित पवार व दिलीप वळसे पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला. दिशाभूल करू नये. योग्य तीच माहिती द्यावी, अशी मागणी केली.
पुन्हा अध्यक्षांसमोर या प्रश्नाच्या उत्तराबाबत विचारण्यात आले. परंतु आदिवासी विकास मंत्र्यांनी शून्य मृत्यू झाला असल्याची ठाम भूमिका घेतली. त्यानंतर उडालेल्या गोंधळात हा प्रश्न राखीव ठेवण्यात आला. मात्र तरीसुद्धा आज पुन्हा तेच उत्तर आदिवासी मंत्र्यांनी दिल्याने आदित्य ठाकरे संतापले.
आदित्य ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, ‘आदिवासी भागातली परिस्थिती कशी असते, याची आपल्याला लाज वाटायला हवी. प्रश्न राखीव असताना पुन्हा तेच उत्तर दिले जातेय. सर्वपक्षीय समिती स्थापन करून मंत्री काही तोडगा काढणार आहेत का? असं आदित्य ठाकरे म्हणाले. मात्र आदित्य ठाकरे यांच्या बोलण्यानंतर ‘लाज’ या शब्दावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला.
सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांना खडेबोल सुनावले. जयंत पाटलांनी मध्यस्थी केली. मात्र यावर ‘सुधीरभाऊंची भाषणं ऐकून मी प्रेरित झालो. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली तरी, ही परिस्थिती आहे. यात मला सरकारला दोष द्यायचा नाही. मात्र नेते म्हणून ही आपल्याला लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. एवढेच मी म्हणालो, यात माझं काय चुकलं?,’ असे स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या-
Krishna Abhishek: कपिलची बाजू घेत सुनील पालने कृष्णा आभिषेकवर केली सडकून टीका, म्हणाला, शो सोडून…
ED : भाजप आमदाराच्या बेहीशोबी संपत्तीच्या चौकशीकडे दुर्लक्ष करणाऱ्या ईडीला कोर्टाचा दणका; केली ‘ही’ कारवाई
Vijay Deverakonda : विजय देवरकोंडाने ‘लायगर’ चित्रपटासाठी घेतले तब्बल ‘एवढे’ कोटी, मोठमोठ्या स्टार्सला टाकले मागे