२०१९ मध्ये राज्याच्या राजकारणात जे झाले त्यामुळे ठाकरेंचे आणि फडणवीसांचे संबंध बिघडल्याची चर्चा होती. त्यानंतर अनेकदा ते एकमेकांवर टीका करताना सुद्धा दिसून आले. अशात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एक हैराण करणारे व्यक्त केले आहे. त्यामुळे ते राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे वडील उद्धव ठाकरे यांच्यासोबत आजही चांगले संबंध आहे. आमच्या मनात कटुता नाही. आमच्या घरामध्ये आम्ही कुणालाही व्यक्तिगत पातळीवर शत्रू मानत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. त्यांनी एका कार्यक्रमाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते.
या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंना वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले होते. तसेच त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदे गट आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आम्ही कोणालाही व्यक्तिगत पातळीवर शत्रू मानत नाही. आम्ही फक्त विचारधारेने विरोधक आहोत, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
फडणवीस आणि वडील उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आजही चांगले संबंध आहे. आमच्या मनात कुणाबद्दलही कटूता नाही. गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या कुटुंबावर अनेक आरोप करण्यात आले. पण कधीही माझ्या तोंडात याबद्दल चुकीची विधानं आली नाही, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
शिंदेंबद्दलही आदित्य ठाकरेंनी वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, त्यांना आम्ही विचारलं होतं. तुम्हाला काय हवं आहे. पण ते काही बोलले नाही. बंडखोरी केली असती तर चाललं असतं. पण त्यांनी गद्दारी केली आहे. जे आधीच विकले गेले होते. त्यांना कसं समजावून सांगणार.
तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मी रोज कामावर बोलत असतो. त्यावर चर्चा करत असतो. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत बरीच चर्चा होत असते. पण ती वैयक्तिक आहे. कोणी कुणाशी युती केली पाहिजे, कुणाशी नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे.
महत्वाच्या बातम्या-
महाविकास आघाडीचे २० आमदार शिंदेगटात प्रवेश करणार; ‘या’ मंत्र्याच्या गौप्यस्फोटाने उडाली खळबळ
सुप्रीम कोर्टात निकाल कोणाच्या बाजूने लागणार? शिंदे गट की ठाकरे गट? कायदेतज्ज्ञ म्हणाले…
एका बाईने राणेंना पाडलं म्हणताच नितेश राणे संतापले, थेट अजितदादांची दुखरी नसच दाबली; म्हणाले..