गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर आपण खरी शिवसेना असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी शिवसेना चिन्हावर आणि नावावर दावा केला होता. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने याबद्दल मोठा निर्णय दिला आहे.
निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला धक्का देणारा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह दिले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या याचीच चर्चा होत आहे. अनेक राजकीय नेते यावर प्रतिक्रिया देत आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यामध्ये त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. यावेळी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना धीर देताना दिसले. त्यावेळी त्यांच्या बाजूला बसलेले आदित्य ठाकरे यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचे दिसले.
पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे मुखयमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्यावर टीका केली. आम्ही लढत राहू, आम्ही खचलेलो नाही आणि खचणारही नाही, असे उद्धव ठाकरे म्हणत होते. ते यावेळी शिवसैनिकांनी धीरही देताना दिसले.
गेल्या महिन्यांपासून सत्तासंघर्ष सुरु आहे. विरोधकांकडून टीका होत आहे. स्वत:च्याच पक्षातील लोकांनी केलेली बंडखोरी या सर्व गोष्टी आदित्य ठाकरे यांनी बघितल्या. यावेळेत ते वडील उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा आधार बनले. त्यांनी अनेक जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेतल्या. बंडखोरांना सडेतोड उत्तरही दिले.
गेल्या काही महिन्यांमध्ये राज्याने आदित्य ठाकरे यांच्यातील एक मजबूत नेतृत्व बघितले. अशात जेव्हा त्यांच्या आजोबांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव आणि चिन्ह अचानक त्यांच्यापासून काढून घेण्यात आलं तेव्हा त्यांना स्वत:ला रोखता आले नाही. त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले. पण त्यानंतर लगेचच त्यांनी स्वत:ला सावरले.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून आयोगाने एकनाथ शिंदेंना दिलं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह; अखेर खरे कारण आले समोर
ठाकरेंच्या जवळच्या माणसानेच केला घात? आयोगाच्या कागदपत्रांतून धक्कादायक माहिती समोर
पत्र्याच्या घरात राहतात, एक गुंठाही जमीन नाही, तरीही महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत माणूस आहे ‘हा’ शेतमजूर