Aditya Thackeray : नुकताच दहशतवादी याकूब मेमन याच्या कबरीचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये याकूब मेमनच्या कबरीला मार्बल आणि लाईट्सने सजवले असल्याचे दिसत आहे. या प्रकरणावरून भाजप नेते राम कदम यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याकूब मेमनच्या थडग्याचे सुशोभीकरण करण्यात आले असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे. यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी यांनी मुंबईकरांची माफी मागावी, असे राम कदम म्हणाले आहेत. या सगळ्या प्रकरणावर युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजपकडून होत असलेले आरोप हे खोटे आणि अतिशय घाणेरडे आहेत. केवळ धार्मिक वाद उकरून काढण्यासाठी या गोष्टी उकरून काढणे कितपत योग्य आहे?, असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे. तसेच भाजपमधील जे नेते आमच्यावर आरोप करत आहेत, ते आमच्यावर चिडलेले आहेत की त्यांच्याच पक्षातील अंतर्गत वादामुळे हे सगळे घडत आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, याबाबतीत दोन-तीन गोष्टी लोकांसमोर येणे गरजेचे आहे. याकूब मेमनला दहशतवादी म्हणून फाशी झाली होती. परंतु, त्याचे दफन इतक्या मानसन्मानाने का झाले? त्यावेळी त्याला इतकी सुरक्षा व्यवस्था का पुरविण्यात आली? ज्याप्रमाणे ओसमा बिन लादेनला समुद्रात दफन केले, याकूब मेमनच्या बाबतीत तसे का घडले नाही?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
तसेच ज्या ट्रस्टकडे याकुब मेमनचा मृतदेह देण्यात आला, ती ट्रस्ट खासगी होती. यात महापालिकेचा संबंध येत नाही. तसेच त्यावेळी महानगरपालिकेकडून एनओसी घेणे आवश्यक होते. मात्र ती घेतली गेली नव्हती. आणखी एक गोष्ट म्हणजे १८ महिन्यांनी एखाद्या दफनभूमीतील कबर रोटेट करावी लागते. ती गोष्ट २०१६ मध्येच व्हायला पाहिजे होती, परंतु ती झाली नाही. त्यावेळी कोणाचे सरकार होते, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
शिवसेनेला आणि आदित्य ठाकरेंना भाजपकडून पेंग्विन सेना म्हणून संबोधले जाते. यावर बोलताना ते म्हणाले की, मुंबईत राणीच्या बागेत पेंग्विन आणल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे. याचा राणीच्या बागेला फायदा होत आहे. त्यामुळे आम्हाला पेंग्विनसेना म्हणत असतील तर त्याचा अभिमान आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
सातारच्या भोसलेंनी देखील शिंदेंना दिलं समर्थन; उद्धव ठाकरेंच्या हातून बालेकिल्ला निसटणार? ‘अशी’ बदलली राजकीय समीकरण
Politics: आता लोकसभा निवडणूक झाली तर भाजपला बसणार मोठा धक्का, सर्वेतून झाला मोठा खुलासा
Palghar: सायरस मिस्त्रींच्या अपघातावेळी नेमकं काय घडलं? मर्सिडीज कंपनीच्या रिपोर्टमधून झाला मोठा खुलासा
AFG vs IND : शेवटच्या सामन्यात विराट-भुवीने रचला इतिहास, भारताचा अफगाणिस्तानवर १०१ धावांनी दणदणीत विजय