Share

Aditya Thackeray : आनंद दिघेंच्या जुन्या आठवणींना आदित्य ठाकरेंनी दिला उजाळा, ‘तो’ खास फोटो केला शेअर

aditya thakare

Aditya Thackeray: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा चर्चेत आलेलं एक नाव म्हणजे शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. स्व.आनंद दिघे यांना आज असंख्य कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. अनेकांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना अभिवादन केले. यातच शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरेंनी आनंद दिघे यांना अभिवादन करताना एक खास फोटो शेअर केला आहे.

युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आनंद दिघेंसोबत असलेला एक जुना फोटो शेअर करत त्यांना अभिवादन केले. या फोटोला कॅप्शन देताना आदित्य ठाकरेंनी लिहिले की, ‘धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.’

आदित्य ठाकरे यांनी आनंद दिघेंसोबतचा जो फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये स्व.आनंद दिघे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे व बालपणीचे आदित्य ठाकरे दिसत आहेत. हा फोटो टेंभी नाक्यावरील नवरात्र उत्सवातील आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे आपल्या परिवारासमवेत देवीचे दर्शन घेण्यासाठी गेले असताना हा फोटो काढण्यात आला होता.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे सत्तानाट्य घडल्यानंतर बाळासाहेबांच्या, स्वर्गीय आनंद दिघेंच्या विचारांचे खरे वारसदार कोण? याबाबतच दावे प्रतिदावे होताना दिसतात. त्यामुळे आज आदित्य ठाकरे यांनी केलेले ट्विट महत्वपूर्ण ठरते.

आनंद दिघे यांनी ठाण्यात सुरु केलेल्या नवरात्र उत्सवाला आणि दहीहंडी उत्सवाला मोठे महत्त्व आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी ठाण्यामध्ये खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीला हजेरी लावली होती. तसेच त्यादिवशी टेंभी नाका येथे जाऊन आनंद दिघेंच्या समाधीचे दर्शन घेतले होते.

आनंद दिघे यांचा २००१ च्या ऑगस्टमध्ये मोठा अपघात झाला होता. त्यानंतर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना २६ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांचे निधन झाले. तो दिवस ठाणेकरांसाठी मोठा दुःखद होता. आजही आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा देताना शिवसेनेचे अनेक जुने कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या डोळ्यात पाणी तरळते.

महत्वाच्या बातम्या-
heart attack : सावधान! आजच सोडून द्या ‘या’ चार सवयी नाहीतर तुम्हालाही येऊ शकतो ह्रदयविकाराचा झटका
Nitish Kumar : अखेर बदला घेतलाच! साथ सोडणाऱ्या नितीश कुमारांना भाजपचा दणका
१५ दिवसांनी शुद्धीवर येताच राजू श्रीवास्तवांनी पत्नीला पाहून उच्चारले ‘ते’ चार शब्द; वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now