बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) मागील अनेक वर्षापासून छोट्या पडद्यावरील ‘सा रे ग म प’ या शोचे सूत्रसंचालन करत आहे. पण आता आदित्यच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. आदित्य यापुढे या शोमध्ये दिसणार नाही. त्याने ‘सा रे ग म प’ या शोला कायमचा रामराम केला आहे. यासंदर्भात त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हा शो सोडत असल्याचे म्हटले आहे.
आदित्यने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने ‘सा रे ग म प’ शोसंबंधित त्याच्या आठवणी शेअर केले आहेत. यामध्ये त्याने अनेक फोटो शेअर करत लिहिले की, ‘खूप जड अंतःकरणाने मला हे सांगावे लागत आहे की, ज्या शोने मला माझी एक वेगळी ओळख मिळवून दिली अशा ‘सा रे ग म प’ या शोमध्ये मी यापुढे सुत्रसंचालन करताना दिसणार नाही’.
आदित्यने पुढे म्हटले की, ‘जेव्हा मी १८ वर्षांचा होतो तेव्हापासून ते आता एक सुंदर पत्नी आणि मुलगी असणाऱ्या एक प्रौढ व्यक्ती होईपर्यंत मी यो शोसोबत जोडलेलो आहे. १५ वर्ष, ९ सीझन आणि ३५० भाग. खरंच वेळ लवकर निघून जातो. माझा भाऊ नीरज शर्मा खूप खूप धन्यवाद’.
यासोबत आदित्यने पोस्टमध्ये पुढे नेहा कक्कड, सोनू निगम, अल्का याग्नी, बप्पी लहरी, हिमेश रेशमिया, विशाल ददलानी, शान, साजिद वाजिद, प्रीतम आणि मिका सिंहसोबत इतर अनेक लोकांचे आभार मानले. हे सर्वजण शोमध्ये परिक्षक म्हणून सहभागी झाले होते.
आदित्यने मागील वर्षी एका मुलाखतीत बोलताना तो २०२२ मध्ये छोट्या पडद्याला गुडबाय करणार असल्याचे म्हटले होते. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्याने म्हटले होते की, ‘२०२२ हे वर्ष टीव्ही होस्ट म्हणून माझा शेवटचा वर्ष असणार. २०२२ मध्ये मी मोठ्या प्रोजेक्टवर काम करणार आहे. येत्या काही महिन्यात माझे सर्व कमिटमेंट्स पूर्ण होणार आहेत. त्यानुसार सर्व काम संपल्यानंतर मी नवीन सुरुवात करणार आहे’.
आदित्यने ‘सा रे ग म प शो’शिवाय इतरही अनेक शोचे सूत्रसंचालन केले आहे. त्याने ‘इंडियन आयडल’ या शोचेही सुत्रसंचालन केले होते. तर आता आदित्य मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करणार असला तरी तो छोट्या पडद्यापासून लांब जाणार असल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत. चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटीही त्याच्या या पोस्टवर कमेंट करत आपली नाराजगी व्यक्त करत आहेत.
आदित्यच्या या पोस्टवर गायक विशाल ददलानी यांनी कमेंट करत लिहिले की, ‘मी काय बोलू? तुझा पहिला ‘सा रे ग म प’ हा शो माझासुद्धा पहिलाच शो होता. पण मी आशा करतो की, तु तुझा निर्णय बदलणार. किंवा तु पुढे जे काही करणार आहेस त्यामध्ये तू यशस्वी होवो आणि तुला पुन्हा टीव्हीवर येण्यासाठी वेळच नसो. जा आधी… जी ले अपनी जिंदगी.. लव्ह यू मॅन’.
महत्त्वाच्या बातम्या :
मला जे सांगायचे होते ते मी.., झुंडच्या वादावर नागराज मंजुळेंनी पहिल्यांदाच दिले स्पष्टीकरण
बापलेकीच्या जोडीने केले व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन; एकेकाळी स्वत:च गेले होते दारूच्या आहारी
कीर्तनाच्या व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करणाऱ्यांची मुलं अपंग जन्माला येतील; इंदुरीकरांनी केले पुन्हा वादग्रस्त वक्तव्य