Share

आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवालच्या घरी लवकरच येणार नवा पाहुणा; फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

aditya Narayan And Shweta Agarwal

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आदित्य नारायणच्या घरी लवकरच एका नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. आदित्यची पत्नी श्वेता अग्रवाल प्रेग्नेंट असून लवकरच ते दोघे आई-बाबा होणार आहेत. सोशल मीडियाद्वारे आदित्य आणि श्वेताने (aditya Narayan And Shweta Agarwal) चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. त्यांच्या या बातमीनंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

आदित्यने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर श्वेतासोबतचा मॅटरनिटी शूटदरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये श्वेताचा बेबी बंप दिसून येत आहे. आदित्य सोफावर बसलेला असून तो पत्नी श्वेताला प्रेमाने जवळ घेतलेला यामध्ये दिसून येत आहे. तसेच आई-बाबा होणार असल्याने दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.

हा फोटो शेअर करत आदित्यने लिहिले की, ‘श्वेता आणि मी हे सांगण्यास खूपच उत्सुक आहोत की, लवकरच आम्ही आमच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहोत’. आदित्यची पत्नी श्वेता अग्रवालनेही तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर ही पोस्ट शेअर केली आहे. आदित्य आणि श्वेतासंदर्भात ही बातमी समोर येताच चाहत्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेकजण त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

https://www.instagram.com/p/CZGclahvlT4/

ई-टाईम्सशी बोलताना आदित्यने सांगितले की, ‘श्वेता आणि मी आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. आता मला आणि श्वेताला अधिक काम करावे लागेल. कारण मी स्वतः एका लहान मुलापेक्षा कमी नाही. लवकरच आमचे घर आनंदाने भरेल’.

त्याने पुढे सांगितले की, ‘हे थोडेसे फिल्मी वाटेल पण माझ्या ३० व्या वाढदिवशी मी एक स्वप्न बघितलं होतं की, श्वेता माझ्या मुलाला घेऊन उभी आहे. पण तेव्हा अजून आमचा साखरपुडासुद्धा झालेला नव्हता. पण आता मी खूश आहे की, माझे स्वप्न पूर्ण होत आहे’. तसेच यावेळी आदित्यने सांगितले की, लवकरच श्वेताच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात केवळ दोघांचे कुटुंबीय आणि मोजके लोक सहभागी होणार आहेत.

दरम्यान, आदित्य आणि श्वेता ‘शापित’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. जवळपास १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १ डिसेंबर २०२० रोजी ते विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या :
‘पुष्पा’च्या यशानंतर शरद केळकरने व्यक्त केली भिती; म्हणाला, आपण आपलं मुळ विसरतोय त्यामुळं..
CID मधील ACP प्रद्युमन यांना मिळेना काम; म्हणाले, हे माझं दुर्भाग्य आहे की मी घरी बसून..
VIDEO: श्रेयस तळपदेची एअरपोर्टवर धाकड एन्ट्री; म्हणाला, ‘पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या?’

 

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now