स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. सध्या मालिकेत अपूर्वा आणि शशांकच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. या दोघांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून आता हळदी कार्यक्रमासाठी आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत यांनी हजेरी लावली आहे.
शशांक आणि अपूर्वाच्या हळदी कार्यक्रमासाठी गायक आदर्श शिंदे, गायिका वैशाली सामंत यांच्यासोबत ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील किर्तीने खास हजेरी लावली आहे. यावेळी सर्वांनी आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत यांच्या सुपरहिट गाण्यावर डान्स करत धमाल उडवली.
यापूर्वी मालिकेत ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपाने शशांक-अपूर्वाच्या केळवणाच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यानंतर आता संपूर्ण स्टार प्रवाह परिवारसोबत शशांक-अपूर्वाचा हळदी सोहळा खूपच रंगतदार झाला.
‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका एका बंगाली मालिकेचा रिमेक असून ती एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व अधोरेखित करते. यामध्ये अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर अपूर्वाच्या भूमिकेत तर अभिनेता चेतन वडनेरे शशांकच्या भूमिकेत आहे.
मालिकेत शशांक हा एक साधा व संस्कार आणि मूल्य जपणारा मुलगा आहे. तर दुसरीकडे अपूर्वा अगदी त्याच्या विरोधी विचारांची मुलगी आहे. मात्र, आता हे दोन वेगवेगळ्या विचारांचे व्यक्ती लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. तर पुढे त्यांचे आयुष्य कसे राहणार? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
किरण माने मोदींना ‘फेकू’ आणि फडणवीसांना ‘हरामखोर’ म्हणाले? वाचा ‘त्या’ पोस्टमागील सत्य
‘देवों के देव महादेव’मधील पार्वतीने आतापर्यंत १०० मुलांना लग्नास दिलाय नकार, कारण वाचून अवाक व्हाल
२ एकरमध्ये पसरलेल्या आलिशान घरात राहतो स्टायलिश अल्लू अर्जुन, किंमत वाचून थक्क व्हाल