गेल्या काही दिवसांपूर्वीच सुप्रसिध्द गायक बप्पी लहरी यांचे वयाच्या 65 व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात दु:खद निधन झाले आहे. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण बॅलिवूड विश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे. बप्पी लहरी यांच्या निधनाच्या धक्क्यातून सर्व कलाकार सावरत असतानाच अभिनेत्री अदा शर्माने बप्पी दासोबतचा एक फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
परंतु या फोटोमुळे बप्पी दा चे चाहते अदा शर्मावर चांगलेच फडकलेले दिसून आले आहेत. अदा शर्माने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये एका बाजूला अदा शर्मा आणि दुसऱ्या बाजूला बप्पी दा दिसत आहे. परंतु या फोटोत अदा शर्माने दागिने घातले आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांनी अदाला चांगलच ट्रोल केलाय.
बप्पी शर्मा यांना देखील दागिण्यांची फार आवड होती. परंतु तसेच दागिने अदाने घातलेले चाहत्यांना आवडलेले नाही. या फोटोमुळे ‘प्रसिद्धीसाठी दिग्गज व्यक्तींच्या फोटोंचा वापर का?’ असा सवाल अदाला विचारण्यात आला आहे.
इतकेच नव्हे तर, तिच्या कपड्यांवरुन देखील अदाला ट्रोल करण्यात आले आहे. सध्या अदा आणि बप्पी दाचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. यापुर्वी एका मुलाखतीत बोलताना बप्पी दाने सांगितले होते की, “ एलविस प्रेसले हे अमेरिकन गायक ह़ॉलिवूडमध्ये सोन्याची साखळी गळात घालत असत.
मला ते फार आवडत होते. त्याचवेळी मी ठरवलं की मी यशस्वी होऊन ते यश वेगळ्या पद्धतीने साजरा करेन. त्या क्षणी मी खूर सारं सोनं वापरू लागलो, सोनं माझ्यासाठी भाग्याचं प्रतीक आहे.” बप्पी दाचे दागिने घालणे सर्वांनाच आवडत होते. एकदा सुप्रसिध्द डान्सर मायकल जॅक्सनने देखील त्याच्या दागिण्यांची आणि गाण्यांची तारीफ केली होती.
दरम्यान निधनाच्या काही दिवसांपासून बप्पी दा यांची प्रकृती खालावलेली होती. त्याच्यावर उपचार देखील सुरु होते. परंतु शेवटी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. बप्पी दा यांची अनेक गाणी लोकप्रिय आहेत. यामध्ये “द डिस्को” गाणे सर्वात जास्त लोकप्रिय आहे.
महत्वाच्या बातम्या
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी करा लसण्याच्या पाण्याचे सेवन, एका आठवड्यात दिसेल फरक
नवाब मालिकांना ईडीच्या कोठडीत पोटदुखीचा त्रास, उपचारासाठी जे. जे रुग्णालयात केले दाखल
कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी सोडल्यानंतर निरोप देताना झाला पिता, युक्रेनमधील व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
डॉ. सुवर्णा वाजे जळीतकांडाचा गुंता सुटेना, आणखी एका नवीन खुलाश्याने पोलिसांना बसला धक्का