मनोरंजन क्षेत्रातील कलाकार हे नेहमी आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. हे कलाकार नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्याचबरोबर चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. अशाच एक बॉलीवूड अभिनेत्रीने चाहत्यांसाठी एक व्हिडिओ शेअर केला. जो सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ बॉलीवूड अभिनेत्री अदा शर्माचा आहे. अदा शर्मा ही तिच्या अभिनयामुळे आणि रिल्समुळे चर्चेत असते. नुकताच तिने एक व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे. हा व्हिडिओ तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला. तिचा हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
या व्हिडिओमध्ये अदा मुंबईच्या रस्त्यांवरील कचरा उचलत आणि रॅम्प वॉक करताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर, तिने या व्हिडिओमध्ये कचऱ्याची तुलना तिच्या बॉयफ्रेंडशी केली आहे. अदा ही डस्टबिन सोबत रिल्स करताना दिसत आहे. त्याचबरोबर अदा कचरा अनोख्या स्टायलने उचलताना ही दिसत आहे.
तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर तिच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाइक्स मिळत आहे. तसेच चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया देखील येत आहेत. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
अदा शर्माबद्दल बोलायचे झाले तर, ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांसोबत संवाद साधत असते. तिने २००८ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या कारकिर्दीतील ‘१९२०’ हा पहिला चित्रपट आहे.
या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला एक नवीन दिशा मिळाली. या चित्रपटानंतर तिने कधीही मागे वळून पाहिल नाही. त्यानंतर तिने ‘हंसी तो फसी’, ‘कमांडो ३’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. तसेच ती सध्या तिच्या या व्हिडिओमुळे खूप चर्चेत आहे.