सोशल मिडीयावर सतत मॉडेल्स आणि अभिनेत्रींना ट्रोल करण्यात येत असते. अगदी घाणेरड्या पद्धतीने या मॉडेल्स आणि अभिनेत्रींवर नेटकरी कमेंट्स करतात. अनेक वेळा त्यांचे मादक फोटो पाहून त्यांची खुलेआम खिल्ली उडवण्यात येते. परंतु अशा प्रकारांवर सर्वच मॉडेल्स आणि अभिनेत्री शांत बसत नाहीत. त्या या सर्व गोष्टींना सडेतोडपणे उत्तर देतात.
अशाच अभिनेत्रींमध्ये पूनम पांडेचा देखील समावेश आहे. पुनमला तिच्या मादक फोटोंमुळे सर्वांत जास्त ट्रोल करण्यात येते. परंतु ती शांत बसत नाही. प्रतिउत्तर करण्याची तीची नेहमी तयारी असते. नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना पुनमने अशा ट्रोल करणाऱ्या लोकांना चांगलेच सुनावले आहे. त्याचबरोबर तिने त्यांना काही सवाल विचारले आहे.
कार्यक्रमात आपल्या संघर्षाविषयी भाष्य करताना पुनमने म्हटले आहे की, मी अंगप्रदर्शन करते, विवस्त्र होते, यासाठी तुम्ही मला शरम नसणारी वगैरे म्हणणार? तर मी तुमच्या मताशी सहमत नाही. कारण, जे दुसऱ्याच्या शरमेवर बोलतात त्यांनी स्वत:बद्दल विचार करावा.
तसेच एखाद्या पोस्टवर 60 मिलियन इंप्रेशन, 200 मिलियनचा टप्पा तोही एका महिन्यात हे सर्व असंच तर नाही ना होत. हे कोण फॉलोअर्स आहेत? असा सवाल तिने उपस्थित केला आहे. इतकेच नव्हे तर, रात्री ही लोकं माझे व्हिडीओ पाहतात आणि सकाळी मला ट्रोल करतात, माझ्याविरोधात बोलतात, मला ठाऊक करुन घ्यायचंय की कोण आहेत ही माणसं? अशा शब्दात तिने समाजाच्या मानसिकतेवर निशाणा साधला आहे.
पुढे तिने म्हटले आहे की, मी लग्न कोणाशी केलं, मी कसे कपडे वापरावेत, बाळाला कधी जन्म द्यावा हे मी ठरवेन कारण हे माझं आयुष्य आहे. समाज दुसरं तिसरं काही नसून 5 बायकांनी एकत्र येऊन दुसऱ्या बायकांचे वाभाडे काढायचे असेच आहे.
तिच्या या वक्तव्यावर अनेकांनी सहमती दाखवली आहे. आपल्याकडे मॉडेल्स आणि अभिनेत्रींना ट्रोल करण्याच्या घटना नेहमी घडत असतात. यावर कारवाई होत असली तरी याचे प्रमाण कमी होत नाही. समाजात मॉडेल्स आणि अभिनेत्रींला नेहमी वेगळ्या नजरेने पाहण्यात येते. परंतु आयुष्याविषयी कोणी ही खोलवर विचार करत नाही.
महत्वाच्या बातम्या
VIDEO: ‘व्वा! काय आयडिया आहे, आपण देखील असा विचार करायला हवा’, आनंद महिंद्रांचा नितीन गडकरींना सल्ला
‘भारत माता की जय’ म्हणताच आलेला जोश मोदीजी जिंदाबाद म्हणताच उतरला, व्हिडीओ व्हायरल
मुंबईची दक्षा अडकली युक्रेनमध्ये, आईवडिलांना फोन करुन म्हणाली, पप्पा मला वाचवा, इथं…
काकाच्या मुलीवर प्रेम करणे पडले महागात, काकाने ‘असा’ काढला पुतण्याचा काटा, वाचून धक्का बसेल