Share

साऊथच्या ‘या’ अभिनेत्रींनी देशभरात घातलाय धूमाकूळ; मानधनात बॉलिवूड अभिनेत्रीही त्यांच्यासमोर भरतात पाणी

सध्या मनोरंजन क्षेत्रात अनेक कलाकार आपली जादू करत आहेत. यामध्ये सध्या अभिनेत्रींचे वर्चस्व दिसून येत आहे. अभिनेत्री आपल्या अदाकारीने चाहत्यांना वेड लावले आहे. तसेच आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. सध्या या अभिनेत्रींची फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त आहे. बॉलिवूडप्रमाणेच साऊथ चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री देखील प्रत्येक बाबतीत अग्रेसर आहेत.

साऊथ चित्रपट हे फक्त भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात पाहिले जातात. कमाईच्या बाबतीत ही बॉक्स ऑफिसवर साऊथ चित्रपटाचा पहिला नंबर लागतो. साऊथच्या अभिनेत्रींची देखील क्रेझ सध्या संपूर्ण देशात पसरली आहे. त्यांचा चाहता वर्ग देखील जबरदस्त आहे. त्याचबरोबर या अभिनेत्री कमाईच्या बाबतीत ही पुढे आहेत. याच संदर्भात जाणून घेणार आहोत.

१) अनुष्का शेट्टी

साऊथ चित्रपटसृष्टीत सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून अनुष्का शेट्टी. कमाईच्या बाबतीत अनुष्का शेट्टीचा पहिला नंबर लागतो. अनुष्काने ‘बाहुबली’ या चित्रपटातून देवसेना ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली होती. तसेच ती एका चित्रपटासाठी जवळजवळ ४ करोड रुपये मानधन घेते.

२) रश्मिका मंदाना

अभिनेत्री रश्मिका मंदानाला नॅशनल क्रश म्हणून ओळख मिळाली आहे. सध्या तिची क्रेझ संपूर्ण जगात आहे. रश्मिकाने अनेक चित्रपटात काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा ‘पुष्पा : द राइस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये ती मुख्य भूमिकेत दिसून आली. तसेच रश्मिका एका चित्रपटासाठी ३ करोड रुपये मानधन घेते.

३) सामंथा रूथ प्रभू

साऊथ चित्रपटसृष्टीत सामंथा रूथ प्रभू हे एक प्रसिद्ध नाव आहे. सामंथाने जवळपास सर्वच मोठ्या कलाकारांसोबत काम केलेले आहे. त्याचबरोबर ती आता बॉलिवूडमध्ये ही आपली जादू दाखवत आहे. कमाईच्या बाबतीत ती या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच एका चित्रपटासाठी ती २ ते २.५ करोड रुपये मानधन घेते.

४) काजल अग्रवाल

साऊथ चित्रपटसृष्टीत काजल अग्रवाल हे नाव देखील टॉपच्या यादीत आहे. काजलने आपल्या अदाकारीने चाहत्यांना वेड लावले आहे. तसेच तिने बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे. त्याचबरोबर ती एका चित्रपटासाठी १ ते १.५ करोड रुपये मानधन घेते.

५) तमन्ना भाटिया

अभिनेत्री तमन्ना भाटियाने साऊथ चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्ये देखील आपली जादू दाखवली आहे. तमन्नाने अनेक चित्रपटात काम केले आहे. एकाहून एक हिट चित्रपट तिने दिले आहेत. तसेच ती एका चित्रपटासाठी १ कोटी रुपये इतके मानधन घेते.

 

 

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now