झी मराठीवर सत्यवान सावित्री ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यात सावित्रीच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी तिच्या सौंदर्याने कायमच प्रेक्षकांना मोहित करते. आता तिला सावित्रीच्या भूमिकेत बघणे चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे. तिची जोरदार चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. (vedangi kulkarni, zee marathi, satyavan, savitri, aditya surve )
वेदांगी कुलकर्णी आणि आदित्य दुर्वे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. वेदांगीला दिलेल्या सुंदर लूकची चर्चा चाहत्यांमध्ये जोरदार आहे. वेदंगी ही उत्तम डान्सर आहे. ती ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. स्टार प्रवाहवरील ‘साथ दे तू मला’ या मालिकेत वेदांगीने काम केले आहे. तिची ती मालिका फार लोकप्रिय झाली होती.
वेदांगी मुळची मुंबईची आहे. तिने डहाणूकर कॉलेज, डी जी रुपारेल कॉलेज येथून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. मुंबईत ती ‘व्हिक्टोरियस डान्स अकॅडमी’ चालवते. त्या अकादमीमधून अनेकांना तिने नृत्याचे शिक्षण दिले आहे. सूर राहू दे ही मालिका तर लंडनच्या आजीबाई, मऊ, छडा, लौट आओ गौरी, बिलिव्ह इन सारख्या नाटकांमध्ये तिने काम केले आहे. तसेच वेबसिरीजच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
वेदांगी कुलकर्णीने जून २०२१ मध्ये अभिषेक तिळगुळकरसोबत साखरपुडा केला. नोव्हेंबरमध्ये तिने अभिषेकसोबत राजेशाही थाटात लग्नगाठ बांधली. लग्नाच्या फोटोज् मध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. एकदम शाही थाटात झालेल्या या लग्नात वेदांगीने पिवळ्या रंगाची पैठणी साडी घातली होती. त्यात तिचे रूप अधिकच खुलून दिसत होते. तिचे लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज हे मात्र तिने मिडियासमोर स्पष्ट केले नाही.
वेदांगी सत्यवान सावित्री मालिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती मालिका १२ जूनपासून प्रसारित होणार आहे. महाभारताच्या वनपर्वातील सत्यावान सावित्रीच्या प्रसिद्ध कथेवर आधारित ही मालिका तयार करण्यात आली आहे. यमापासून आपल्या पतीचा जीव सावित्री कसा परत आणते. याची कथा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये फार लोकप्रिय आहे.
उत्तम कथानक असणारी ही पौराणिक मालिका झी मराठी या वाहिनीवर लोकांना पहायला मिळणार आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी फार आकर्षक दिसत आहे. मालिकेच्या सुरुवातीला सावित्रीचे बालपण दाखवण्यात येणार असून मालिकेने लीप घेतल्यावर पुढील येणाऱ्या भागांमध्ये सावित्रीच्या तरुणपणीच्या भूमिकेसाठी वेदांगीला कास्ट करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तरडेंच्या ‘सरसेनापती हंबीरराव’वर दिली प्रतिक्रिया; म्हणाले, या चित्रपटात…
काश्मिर फाईल्सचे निर्माते, कलाकार, समर्थक शांत का? काश्मिरमधील हत्यासत्रावर राष्ट्रवादीचा संतप्त सवाल
फडणवीसांनी संधी साधली! आता शिवसेनाच अडकली संकटात, राज्यातली सत्ता धोक्यात?