आजवर हिंदी सिनेसृष्टीत बोल्ड वेबसिरीज पाहायला मिळाल्या. मात्र आता मराठी सिनेसृष्टीत देखील आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. याच वेबसिरीजचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून, यामध्ये अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर काढलेले कपडे पाहून सर्व थक्क झाले आहेत.
या वेबसिरीजचा टिझर पाहून ही आजवरची सर्वात बोल्ड मराठी वेबसिरीज असल्याचे बोलले जात आहे. या वेबसिरीजमुळे मराठी सिनेसृष्टीत नक्कीच हादरा बसेल अशी चर्चा सुरू आहे. या वेबसिरीजचे नाव ‘रानबाजार’ असे आहे. याचे दिग्दर्शक अभिजित पानसे आहेत.
या वेबसिरीजच्या माध्यमातून पानसे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकताच ‘रानबाजार’ या सीरिजचा टीझर तेजस्विनी पंडितने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात तेजस्विनी तिचे कपडे काढताना दिसते आहे.
टीझरच्या बॅकग्राऊंडला महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सुरू असल्याचं ऐकू येत आहे. हा टीझर शेअर करताना तेजस्विनीने कॅप्शन दिले आहे. तिचे कॅप्शन वाचून अनेकजण थक्क झाले आहेत. कॅप्शन वरून ही वेब सिरीज अतिशय जबरदस्त असल्याच्या चर्चा होत आहेत.
कॅप्शनमध्ये तेजस्विनीने लिहिले की, एकदा लोकांची सेवा करून पाहिली…एकदा प्रेमात त्याग करूनही पाहिला..एकदा बदलाही घेतला..! आता मात्र फसत चाललीय…सत्तेच्या जाळ्यात अडकलेल्या एका फुलपाखरासारखी…वेबविश्वाला हादरवून टाकणारा ‘रानबाजार’ट्रेलर येतोय 18 मे ला!”
माहितीनुसार, या वेबसिरीजमध्ये तेजस्विनी पंडितसह प्राजक्ता माळीही आव्हानात्मक भूमिकेत आहे. तेजस्वीने सिरीजचा टिझर प्रदर्शित केला, त्यात तेजस्वी थेट अंगावरचे कपडे काढताना दिसत आहे त्यामुळे प्रेक्षकांना देखील या वेबसिरीजची उत्सुकता लागून राहिली आहे.