आगामी वेबसीरिज‘रानबाजार’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. मराठी कलाविश्वाला हादरवून टाकणारी ‘रानबाजार’ ही वेबसीरिज आता चांगलीच चर्चेत आली आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि सोज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेली प्राजक्ता माळी यांचा या वेबसीरिजमध्ये बोल्ड अंदाज पाहायला मिळणार आहे.
या वेबसिरिजमध्ये प्राजक्ता माळीने महत्वाची भूमिका साकारली आहे. सत्य घटनांवर आधारित असलेल्या या वेब सिरीजमध्ये प्राजक्ता माळीला तेजस्विनी पंडित साथ देताना दिसून येणार आहे. या सिरीजमध्ये दोघींनीही अतिशय बोल्ड सीन्स दिले आहे. पण यावरुन अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.
यासोबतच सोशल मीडियावर या वेब सीरिजच्या विषयावरून वाद निर्माण झाल्याचं चित्र आहे. रानबाजार या वेबसीरीजा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. त्यात प्राजक्ता माळीचा बोल्ड लूक पाहून प्रेक्षकांनी आश्चर्य व्यक्त केलं तर काहींनी प्राजक्ता माळीवर सोशल मीडियावर सडकून टीका केली.
तर, असाच बोल्ड टीझर अभिनेत्री तेजस्विनी पंडितचाही प्रसिद्ध झाल्यावर तिलाही अनेकांनी ट्रोल केलं. तर आता ट्रोर्ल्सना तेजस्विनी पंडिने दिलं सडेत्तोड प्रत्युत्तर दिलं आहे. ‘अभिनेत्री म्हणून मला कपडेच काढायचं असते तर ते मी कुठल्याही म्युझिकवर केलं असते,’ अशा शब्दात तेजस्विनीनं ट्रोर्ल्सची बोलती बंद केली आहे.
ती याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधत होती. पुढे बोलताना ती म्हणाली, ‘कलाकार म्हणून मी ट्रोलिंगच्या पुढे गेली, त्यामुळे या सगळ्याला मी निगेटिव्हली घेत नाही. टीझर किंवा ट्रेलरमध्ये काही नेगिटीव्ह नाहीये पण ते लोकांनी नेगिटीव्ह घेतल्यामुळे ते व्हायरल झालं, पण हरकत नाही ते व्हायरल झालं म्हणून लोकांनी ते बघितलं.’
दरम्यान, यावरच आता तेजस्विनीच्या आईने नेटकऱ्यांचे चांगलेच कान पिळले आहेत. तेजस्विनी पंडितच्या आई ज्योती चांदेकर यांनी एक पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांना झापले आहे. ‘बोल्ड सीन आणि जरा भडक भाषेने इतके भेदरून जायचे मुळात कारण काय?,’ असा संतप्त सवाल ज्योती चांदेकर यांनी उपस्थित केला आहे.
वाचा काय म्हंटलं आहे ज्योती चांदेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये..? ‘रानबाजार वेब सिरीयल दिग्दर्शित करणारे, ती लिहिणारे तुमच्या आमच्यासारखेच चांगल्या घरातील आहेत आणि त्यात अभिनय करणारेही कोणी उठवळ नाहीत. रानबाजार ही एक कलाकृती आहे. त्याकडे तसेच पाहिले पाहिजे. उगाच अनेक लोक स्वतः आयुष्यात पाळत नसलेल्या मूल्यांचे समाज माध्यमावर स्तोम माजवत बसतात तेंव्हा त्यांची शरम वाटते. जगात जे गलिच्छ असते असे मानले जाते ती आपल्याच समाजाची घाण असते. ती स्पष्टपणे दाखवणे यात काहीही चूक नाही,’ असं त्यांनी म्हंटलं आहे.
‘रानबाजार असे त्या मालिकेचे नाव असले तरी खरे नाव त्यामुळे प्रत्येकाच्या मनात येतेच. इथूनच त्या मालिकेच्या यशाला सुरूवात होते. समाजाचे सत्य न्यूड स्वरूपात दाखवणे सध्याच्या काळात तर आवश्यकचआहे. कारण नको त्या गोष्टी तकलादू मूल्यांच्या पदरात लपवून ठेवणाऱ्या लोकांना सध्या सोन्याचे दिवस आलेत. त्यामुळे रानबाजारला विरोध होणे स्वाभाविकच. पण या मालिकेला एक प्रेक्षक म्हणून माझा निर्विवाद पाठिंबा असल्याच त्यांनी म्हंटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
लाल महालातील लावणीचा वाद! अखिल भारतीय मराठा महासंघ आक्रमक; गौमूत्राने केले शुद्धीकरण
…म्हणून आम्ही शरद पवारांची भेट नाकारली; ब्राम्हण महासंघाने स्पष्टच सांगितले
लाल महालात लावणीचं शुटिंग केल्याने गदारोळ; अखेर वैष्णवी पाटीलने मागितली महाराष्ट्राची माफी
‘ते दंगल घडवून आणणार नाहीत याची काळजी घ्या’, मोहन भागवतांच्या दौऱ्याबाबत मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना आवाहन